Karnataka Election : अमित शाह यांच्याविरोधात एफआयआर दाखल; 'त्या' विधानामुळे काँग्रेस आक्रमक

Karnataka Election
Karnataka Election
Updated on

नवी दिल्ली - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सिंह सुरजेवाला, डॉ. परमेश्वर आणि डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा तसेच भाजपच्या मेळाव्याच्या आयोजकांविरोधात बेंगळुरूच्या हायग्राऊंड्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. प्रक्षोभक विधाने, द्वेष पसरविणे आणि विरोधकांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Karnataka Election
Pulwama Attack : संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले देशाची सुरक्षा...

काँग्रेस सत्तेत आल्यास शाह यांच्या दंगलीबाबतच्या विधानाचा दाखला देत कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले की, कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. एखाद्या सामान्य माणसाने असे केले असते तर त्याला अटक झाली असती. काँग्रेस सत्तेत आल्यास जातीय दंगली होतील हे केंद्रीय गृहमंत्री सांगू शकत नाहीत. ते गृहमंत्री आहेत, भाजपचे स्टार प्रचारक नाहीत.

अमित शाह म्हणाले होते की, 'काँग्रेसचे सरकार आल्यास कर्नाटकचे भवितव्य रिव्हर्स गियरने पाठिमागे जाईल. चुकूनही काँग्रेस आली तर आजवरचा सर्वात मोठा भ्रष्टाचार, तुष्टीकरण, परिवारवाद निर्माण होईळ. तसेच संपूर्ण कर्नाटकमध्ये दंगली उसळतील. ही पिढी परिवर्तनाची निवडणूक आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा एकदा सरकार स्थापन करू, असंही शाह म्हणाले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()