BREAKING: कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी; शोध मोहीम सुरु

कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोध मोहीम सुरु केली आहे
Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway knp94
Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway knp94
Updated on

बंगळुरु- कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोध मोहीम सुरु केली आहे.( Karnataka Raj bhavan receives bomb threat call search ops underway)

कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. यंत्रणा सतर्क करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ शोध मोहीम सुरु केली.

फोन कोन केला याबाबत काही कळू शकलेले नाही. फोन कॉल आल्यानंतर बॉम्ब स्कॉडला पाचारण करण्यात आले. त्यानंतर राजभवन परिसरात शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे सुरक्षा यंत्रणाची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं.

सुरक्षा यंत्रणांनी राजभवन परिसराची तपासणी केली आहे. आतापर्यंत त्यांना काहीही संशयास्पद आढळून आलेलं नाही. तरी खबरदारी म्हणून सर्वत्र कसून शोध सुरु आहे. फोन कॉलच्या उगमाबाबतही तपास सुरु आहे. फोन कॉल ट्रेस करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

विशेष म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेलाही याबाबत अलर्ट कॉल आला होता. यात राजभवनमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश देण्यात आला होता. त्यानंतर एनआयएने बंगळुरु पोलिसांना सतर्क केले. याप्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.