'अवयवदान करताना तुम्ही घेतलेला निर्णय सोपा नाही. तुमच्यामुळे इतरांचे प्राण वाचले आहेत. अडचणीच्या वेळी सरकार तुमच्या पाठीशी असेल.'
बंगळूर : अवयवदानाच्या (Organ Donation) बाबतीतही कर्नाटक (Karnataka) देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. रक्तदात्याच्या कुटुंबाला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेईल. अवयवदात्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत, असे मुख्यमंत्री सिध्दरामय्या (CM Siddaramaiah) यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान कावेरी येथे विविध अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशस्तीपत्रांचे वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, अवयवदान केले पाहिजे. अवयवदान करताना तुम्ही घेतलेला निर्णय सोपा नाही. तुमच्यामुळे इतरांचे प्राण वाचले आहेत. अडचणीच्या वेळी सरकार तुमच्या पाठीशी असेल. आपल्या मागील कार्यकाळात अवयवदानासाठी संस्थेची स्थापना केल्याची आठवण करून देत मुख्यमंत्र्यांनी अवयवदानासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येण्याचे आवाहन केले.
आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव (Dinesh Gundurao) म्हणाले की, अवयवदानासाठी नोंदणी केलेल्यांची संख्या आठ हजारांहून अधिक असून गेल्या वर्षभरात केवळ १७८ अवयवदान झाले आहेत. अवयवदानाबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने अवयवदान करणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रशस्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.