बजरंग दलाचे (Bajrang Dal) कार्यकर्ते रामनवमीची मिरवणूक काढत होते.
काल (गुरुवार) देशभरात रामनवमी (Ram Navami) उत्साहात साजरी करण्यात आली. पण, कर्नाटकात मोठा जातीय हिंसाचार उसळला होता.
कर्नाटकातील हसन शहरात (Karnataka Hassan) रामनवमीच्या मिरवणुकीत मशिदीबाहेर दोन गटांत हिंसक हाणामारी झाली. यावेळी झालेल्या चाकूहल्ल्यात 4 जण गंभीर जखमी झाले.
पोलिसांनी यातील तिघांची ओळख मुरली, हर्ष आणि राखी अशी सांगितली आहे. पोलीस म्हणाले, दोन हल्लेखोर मिरवणुकीत घुसले आणि त्यांनी चाकू चालवण्यास सुरुवात केली. यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले. चन्नारायपटनाजवळ ही घटना घडली आहे.
बजरंग दलाचे (Bajrang Dal) कार्यकर्ते रामनवमीची मिरवणूक काढत होते. पोलिसांनी सांगितलं की, 'जेव्हा मिरवणूक बेगुर रोडवरील मशिदीजवळ पोहोचली, तेव्हा दोन व्यक्तींनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांशी वाद घातला आणि चार जणांना भोसकलं.'
आणखी एक तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली आहे. मिरवणुकीतील काही लोक त्यांच्यासोबत दगड आणि काठ्या घेऊन गेले होते, असा दावा अजहर अहमदनं केला आहे. अहमदनं पोलिसांना सांगितलं की, रॅलीतील लोक 'मुस्लिमांना (Muslim) पाकिस्तानात पाठवा' अशा घोषणा देत होते. बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी आपल्याला घेरल्याचा दावाही त्यानं केलाय. याशिवाय, काहींनी माझ्या वाहनावर दगडफेक केली. 15 ते 20 जणांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही अहमदनं केला आहे.
गुरुवारी रामनवमीच्या उत्सवादरम्यान देशभरात गटांमध्ये हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या. महाराष्ट्रातील छ. संभाजीनगरमध्येही मोठा हिंसाचार झाला होता. बिहारमधील मुंगेरमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार उसळल्यानंतर 200 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.