कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन यंदा बेळगावात; 10 कोटींची मंजुरी

कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन यंदा बेळगावात; 10 कोटींची मंजुरी
Updated on
Summary

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात आल्यानंतर बेळगाव येथील सुवर्णसौधला हिवाळी अधिवेशन घेण्याची घोषणा केली.

बेळगाव : बेळगावला अधिवेशन घेण्यासाठी १० कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे हिवाळी अधिवेशन आता बेळगावात (Belgaum Udpate) होण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. अधिवेशन पूर्वतयारी, इमारत दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. राज्यात अलिकडे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (B.S. Yediyurappa) यांना पायउतार व्हावे लागले आणि त्याजागी बसवराज बोम्मई (Basavraj Bommai) यांची वर्णी लागली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यात आल्यानंतर बेळगाव येथील सुवर्णसौधला हिवाळी अधिवेशन घेण्याची घोषणा केली. (Political News)

कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन यंदा बेळगावात; 10 कोटींची मंजुरी
मोदींच्या वाढदिनी लसीकरणाचा विक्रम! भारतात दिवसभरात दिले दोन कोटी डोस

मागील तीन वर्षापासून अतिवृष्टी, महापूर आणि कोरोनासाठी घोषित लॉकडाऊनमुळे अधिवेशन भरविणे शक्य झाले नाही. त्यामुळे नियोजित अधिवेशन बेळगाव येथे भरविणे शक्य झाले नाही. पण, बोम्मई यांनी अधिवेशन घेण्यासाठी स्वारस्य दाखवल्याचे दिसते. (Karnataka Government) बंगळूरमध्ये सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्याठिकाणी पुरवणी अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशनासाठी आवश्‍यक निधीची तरतूद केली आहे. दहा कोटी रुपयांचा निधी अधिवेशनाला मंजूर केला असून, निधीद्वारे अधिवेशन भरविणे आणि दुरुस्ती संदर्भामधील कामे हाती घेतली जात आहेत. यामुळे हिवाळी अधिवेशन बेळगावात घेण्यावर जवळपास निश्‍चित झाल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे ३ वर्षानंतर बेळगावात अधिवेशन होणार आहे.

कर्नाटकाचे हिवाळी अधिवेशन यंदा बेळगावात; 10 कोटींची मंजुरी
दिल्ली: CBI कार्यालयाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

हालगा-बस्तवाडमधील सुवर्णसौध म्हणजे पांढरा हत्ती ठरला आहे. सुवर्णसौध अधिवेशनसाठी मर्यादित राहिले आहे. त्यामुळे देखभालीवर कोट्यावधी दरवर्षी खर्च सुरु आहे. त्यामुळे काही महत्वाची आणि उत्तर कर्नाटकाशी संबंधीत कार्यालये बेळगावला स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. पण, त्याबाबतचेही घोंगडे भिजत पडले आहे. अपवाद काही कार्यालये स्थलांतरीत करण्यात आली आहेत. पण, अनेक प्रस्ताव लालफितीत बंद आहेत. यामुळे सुवर्णसौधचा वापर वाढविण्यासाठी अधिवेशनाची औपचारिकता पूर्ण करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.