अलीगड : अलिगडच्या जिल्हा कारागृहात हिंदू-मुस्लीम महिलांनी एकत्र येऊन करवा चौथ सण मोठ्या थाटामाटात साजरा केला. करवा चौथ सणानिमित्त कारागृह प्रशासनाने केलेल्या बंदोबस्तात कारागृहात बंदिस्त असलेल्या महिला कैद्यांना चंद्रदर्शन घेतले.
महिला कैद्यांनी यावेळी चंद्राला अर्घ्य देऊन आणि पतीची आरती करून आपला उपवास साडलो. कारागृहात बंदिस्त असलेल्या महिला कैद्यांनी म्हटलं की, अलिगड कारागृहाच्या इतिहासात प्रथमच कारागृहात करवा चौथचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
करवा चौथच्या दिवशी आम्ही आमच्या पतीला पाहू शकू अशी आम्हाला अपेक्षा नव्हती. तसेच करवा चौथच्या दिवशी तुरुंग प्रशासनाकडून असा कार्यक्रम आयोजित केला जाईल, याचा कधी विचारही केला नव्हता, असंही ते म्हणाले. आज कारागृहात ज्या प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, त्याबद्दल तुरुंग प्रशासनाच्या आम्ही खूप आभारी आहोत.
करवा चौथ सणाच्या निमित्ताने आज कारागृहात करवा चौथ उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे जेलर पी.के. सिंग यांनी सांगितले. कारागृहात अशा काही महिला आहेत, ज्यांचे पतीही तुरुंगात शिक्षा भोगत आहेत. करवा चौथ सण सनातन धर्मात ऐतिहासिक मानला जातो. त्यामुळे ज्या महिला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत, त्यांना सण साजरा करण्याची संधी मिळाल्याचं सिंग यांनी म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.