Delhi : काशी-मथुरा मंदिर वाद ; स्वामी न्यायालयात जाणार

अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काशी विश्वनाथ मंदिर तसेच मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर प्रकरणाच्या वादावर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
kashi mathura
kashi mathurasakal
Updated on

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न मार्गी लागल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात काशी विश्वनाथ मंदिर तसेच मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर प्रकरणाच्या वादावर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, असे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

kashi mathura
Delhi-Construction Site Ban: दिल्लीत बांधकामावर तात्पुरती बंदी; वाढत्या प्रदूषणामुळे निर्णय; ‘बीएस-३’ वाहनांनाही मनाई

काशी आणि मथुरा येथील मंदिरे पुनर्स्थापित करण्याच्या अनुषंगाने आपण याचिका दिल्या आहेत, त्या लवकरात लवकर सूचीबद्ध कराव्यात, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाकडे करणार आहोत, असे स्वामी यांनी म्हटले आहे. ''पंतप्रधान मोदी आता काही करणार नाहीत, पण श्रेय घेण्यासाठी लगेच येतील'' अशी टीकाही स्वामी यांनी केली.

kashi mathura
Kashi Halwa Recipe : रव्याचाच शिरा खाऊन कंटाळलात? १५ मिनिटांत तयार होणाऱ्या कोहळ्याच्या शिऱ्याची रेसिपी सांगू का?

राम मंदिर आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांना अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी आमंत्रण मिळाले नव्हते, हे विशेष. आमंत्रण न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर स्वामी यांनी दुःख व्यक्त केले होते. स्वामी यांनी नोव्हेंबर महिन्यात अयोध्येला भेट दिली होती. राम मंदिराच्या मुद्द्यावर अशोक सिंघल यांच्या सांगण्यावरून याचिका दाखल केली होती, असे त्यावेळी स्वामी यांनी सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.