काश्मीरमध्ये 30 वर्षांनंतर उघडणार थिएटर्स; पहिल्या मल्टिप्लेक्सचं काम सुरु

काश्मिरमध्ये थिएटर्स बंद होण्यामागे कोणाची आणि काय भूमिका होती जाणून घ्या
Kashmir multiplex
Kashmir multiplex
Updated on

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिलं मल्टिप्लेक्स उभं राहत असून तीन दशकांनंतर इथल्या नागरिकांना थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहता येणार आहे. यामुळं तरुणांना मनोरंजन क्षेत्रात उतरण्यास प्रोत्साहन मिळणार असून नव्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील असं बोललं जात आहे. (Kashmir all set to get its first multiplex cinema after three decades)

काश्मीर खोऱ्यातील पंडितांचं स्थलांतर आणि त्यानंतर वाढलेल्या दहशतवादी कारवाया वाढल्यानंतर यामुळं सन १९९० मध्ये या ठिकाणी थिएटर्स बंद झाली. मुस्लीम मुलतत्ववादी असलेल्या या दहशतवाद्यांना मनोरंजनाच्या कार्यक्रमांना विरोध असल्यानं त्यांनी इथली थिएटर्स बंद केली होती.

Kashmir multiplex
नड्डांना संघराज्य पद्धत संपवायची आहे का? - उद्धव ठाकरे

दरम्यान, सन २०१९ मध्ये केंद्र सरकारनं जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० हटवलं. त्यानंतर काश्मीरमधील जनजीवन देशातील इतर राज्यांप्रमाणे चालावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगानं इथल्या जनेतला मनोरंजनाचा लाभ मिळावा तसेच या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि रोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

INOX नं बनवलं मल्टिप्लेक्स

येत्या सप्टेंबर महिन्यापासून हे पहिलं मल्टिप्लेक्स सुरु होत असून ते INOX कंपनीनं बनवलं आहे. या थिएटरमध्ये तीन स्क्रीन्स असून प्रत्येक ऑडिटोरिअममध्ये अत्याधुनिक साऊंड सिस्टिम आणि आरामदायी खुर्च्यांची व्यवस्था आहे. यामध्ये रिक्लायनर सीट्सची देखील व्यवस्था आहे.

कशी असेल सुविधा?

या प्रकल्पाचे चेअरमन विजय धार म्हणाले, तरुणांना या थिएटरमध्ये काश्मीरबाहेरील थिएटरमध्ये जी सुविधा मिळते तीच सुविधा मिळेल. या मल्टिप्लेक्सची ५२० सीटची क्षमता असून यामध्ये फूड कोर्ट्स आणि इतर मनोरंजनाच्या सुविधा असतील जे लहान मुलांना आकर्षित करुन घेईल. अशा या मल्टिप्लेक्सचं काम वेगानं सुरु असून लवकरच ते काश्मिरी नागरिकांच्या सेवेत दाखल होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.