Dal Lake : काश्मीरचं दल सरोवर आकुंचन पावतंय! काय खरं अन् काय खोटं?

या तीन वर्षांत परिस्थिती सुधारली असतानाच, सरोवरांची खरी स्थिती उपग्रहाद्वारे बघता येत नसल्याचा दावाही तज्ज्ञांनी केला आहे .
Dal Lake
Dal Lakeesakal
Updated on

Dal Lake : काश्मीर खोऱ्याच्या सौंदर्यात भर घालणारे दल सरोवर आणि वुलर सरोवर आकुंचन पावत असल्याचा दावा खोटा आहे. पर्यावरण विश्लेषकांनी नासाचा हा दावा पूर्णपणे फेटाळला आहे. तीन वर्ष जुन्या चित्राच्या आधारे नासाने हा दावा केल्याचे तज्ञांचे म्हणणं आहे. या तीन वर्षांत परिस्थिती सुधारली असतानाच, सरोवरांची खरी स्थिती उपग्रहाद्वारे बघता येत नसल्याचा दावाही तज्ज्ञांनी केला आहे .

नासाने काश्मीर खोऱ्याची उपग्रह प्रतिमा प्रसिद्ध केली होती आणि श्रीनगरमधील दल सरोवर आणि बांदीपोरामधील वुलर तलाव आकुंचन पावल्याचा दावा केला होता. यासाठी, नासाने उदाहरण म्हणून दिलेले फोटो 23 जून 2020 रोजी लँडसॅट 8 वरून अंतराळ संस्थेच्या ऑपरेशन लँड इमेजरने घेतले होते. या फोटोंच्या आधारे या तलावांमधील पाणी कमी होत असल्याचा दावा केला जात आहे.

तज्ञ काय म्हणतात?

श्रीनगरमधील पर्यावरण विश्लेषक एजाज रसूल यांच्या म्हणण्यानुसार, नासाने तीन वर्षे जुने छायाचित्र प्रसिद्ध केले आहे, या उपग्रह प्रतिमा आहेत. त्यांचा दावा आहे की या तलावांच्या सभोवतालची हिरवळ इतकी वाढली आहे की या तलावांचे क्षेत्र उपग्रह प्रतिमांनी शोधणं शक्यच नाही.गेल्या दोन वर्षांत काश्मीर खोऱ्यात सरकारने असे अनेक प्रयत्न केले, त्यामुळे तलावांची स्थिती सुधारली असल्याचा दावाही त्यांनी केला. सध्या गाळ काढण्याबरोबरच इतरही प्रयत्न सुरू आहेत.

दाट झाडीमुळे योग्य छायाचित्रं घेता आली नाहीत

पर्यावरण विश्लेषक एजाज यांच्या मते, सरोवराच्या अनेक भागात गवत उगवते, उपग्रह प्रतिमांमध्ये हे गवत जमिनीसारखेच दिसते. या कारणास्तव नासाला असं वाटत असावं की तलाव लहान होतोय. परंतु प्रत्यक्षात तसं अजिबात नाही. खरं तर दल आणि वुलर सरोवरे जसेच्या तसे आहेत.

Dal Lake
Jammu Kashmir Terror Attack : कारगिल युध्दात पिता, मुलाचं पूंछमध्ये बलिदान; आईला म्हणाला होता…

नासाचा दावा काय होता?

नासाने जारी केलेल्या चित्रात तळाशी उजव्या बाजूला दल सरोवर दिसत आहे. 16व्या आणि 17व्या शतकात मुघल शासकांनी तयार केलेल्या बागांच्या मधोमध असलेले दल सरोवर आकुंचन पावत असल्याचा दावा या छायाचित्रांच्या माध्यमातून करण्यात आला होता. यामध्ये वरच्या डाव्या बाजूला वुलर तलाव दिसतो, जो आशियातील सर्वात मोठ्या तलावांपैकी एक आहे. हे सरोवरही कमी होत असल्याचा दावा नासाकडून केला जात आहे.

सरोवरांच्या आकुंचनावर संशोधन

जगभरातील सरोवरांच्या आकुंचनावरही संशोधन करण्यात आलंय. त्या संशोधनानुसार जगभरातील 53 टक्के तलाव आणि जलाशयांमध्ये पाणी कमी झालं आहे. मात्र काश्मीरमधील दल आणि वुलर तलावांची नावे या संशोधनात समाविष्ट नाहीत. महिनाभरापूर्वी सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात तलावांमध्ये पाणी कमी असल्याने सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर संकट व्यक्त करण्यात आलं होतं. (Kashmir)

Dal Lake
The Kashmir Files चे निर्माते Adipurush ची १० हजार तिकीटे करणार दान, प्रभासने मानले आभार

संशोधनात, 1992 ते 2020 पर्यंत जगभरातील तलावांच्या उपग्रह प्रतिमांचे मूल्यांकन करण्यात आले. या तलावांमध्ये दरवर्षी 32 गिगा टन पाणी वाया जात असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. संशोधनात याचं कारण हवामान बदल आणि मानवाकडून होणारे शोषण असल्याचे सांगण्यात आलं होतं. या संशोधनात भारतातील 30 हून अधिक सरोवरांचाही समावेश करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.