बिरजू महाराज यांचं आधीचं नाव पंडित ब्रिजमोहन मिश्रा असं होतं. कथ्थकसह ते शास्त्रीय गायनसुद्धा करत होते.
दिल्ली - भारतासह (India) जगभरात आपल्या कथ्थक नृत्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पद्म विभूषण पंडित बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj) यांचं निधन झालं आहे. बिरजू महाराज यांनी रविवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती पंडित बिरजू महाराज यांचे नातू स्वारांश मिश्रा यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
प्रसिद्ध नर्तक बिरजू महाराज यांचा जन्म १९३८ मध्ये लखनऊत झाला होता. लखनऊ घराण्याचे असलेल्या बिरजू महाराज यांचं आधीचं नाव पंडित ब्रिजमोहन मिश्रा असं होतं. कथ्थकसह ते शास्त्रीय गायनसुद्धा करत होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु अच्छन महाराज, काका शंभु महाराज आणि लच्छू महाराज हे सुद्धा कथकचे प्रसिद्ध नर्तक होते.
बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये भारत सरकारने पद्म विभूषण पुरस्काराने गौरवलं होतं. पद्म पुरस्काराशिवाय बिरजू महाराज यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि कालिदास पुरस्कारानेही गौरवण्यात आलं आहे. बिरजू महाराज यांना काशी हिंदू विद्यापीठ आणि खैरागढ विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.