Addiction Free : शैक्षणिक परिसराला तंबाखूमुक्त ठेवावे; केंद्र सरकारच्या राज्यांना सूचना

विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूजन्य उत्पादनांपासून पूर्णपणे मुक्त ठेवण्याच्या आदेशवजा सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत.
keep educational premises tobacco-free Notice to States of Central Govt
keep educational premises tobacco-free Notice to States of Central Govtsakal
Updated on

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी शैक्षणिक संस्थांचा परिसर तंबाखूजन्य उत्पादनांपासून पूर्णपणे मुक्त ठेवण्याच्या आदेशवजा सूचना केंद्राने राज्यांना केल्या आहेत. अशा तंबाखूजन्य उत्पादनांचे सेवन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नये, असेही केंद्राने राज्यांना सांगितले आहे.

शैक्षणिक परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तपणे राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दोन्ही मंत्रालयांच्या सचिवांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी कळविले आहे.

राज्यांना जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या घातक परिणामांकडेही लक्ष वेधले आहे. शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटरच्या परिघात तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री करता येणार नाही, असे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.