UP चे मुख्यमंत्री दिल्लीत जाहिराती का देतात? आपचा अमित शाहांना सवाल

Amit Shah-Arvind Kejriwal
Amit Shah-Arvind Kejriwalgoogle
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) जाहिरातींवर अनावश्यक पैसा खर्चा करतात, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) म्हणाले होते. यावरूनच आम आदमी पक्षाने भाजपवर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath) दिल्लीत खूप जाहिराती देतात. आमच्यापेक्षा भाजपचे योगी जाहिरातींवर अधिक पैसे खर्च करतात, असं आपने म्हटलं आहे.

Amit Shah-Arvind Kejriwal
लसीकरण पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस द्या : अरविंद केजरीवाल

दिल्लीच्या वर्तमानपत्रात दररोज योगी आणि मोदी यांच्या जाहिराती येतात. सध्या दिल्ली सरकारचे राजधानीत फक्त १०८ फलक आहेत. पण, योगी आणि मोदी या दोन्ही नेत्यांचे जाहिरातीचे ८५० फलक आहेत. योगी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना दिल्लीत जाहिराती का देतात? असा सवाल आपने विचारला आहे.

केंद्रातील भाजप सरकार अगदी क्षुल्लक गोष्टीची देखील मोठी जाहिरात करून स्वतः प्रसिद्धी मिळवतेय. आतापर्यंत दिल्ली सरकारने फक्त ७० कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. पण, याउलट योगी सरकारने २ हजार कोटी रुपये जाहिरातींवर खर्च केले आहेत. दिल्ली महापालिकेवर असलेलं भाजपचं सरकार अत्यंत भ्रष्टाचारी आहे. या महापालिकेतील सर्व पैसे भाजप नेत्यांच्या खिशात जातात. तसेच जाहिरातींचा मुद्दा निघालाच आहे, तर सर्व दिल्लीमध्ये फक्त भाजप नेत्यांच्या जाहिराती आहेत, असं आपने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते अमित शाह? -

मुख्यमंत्री अरविंद्र केजरीवाल दिल्ली महापालिकेचे थकीत पैसे देण्याऐवजी जाहिरातींवर अनावश्यक पैसे खर्च करतात. त्यामुळे केजरीवालांनी जाहिरातींवर कमी खर्च करून महापालिकेचे थकीत असलेले १३ हजार कोटी रुपये द्यावे, असं अमित शाह म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.