सिंगापूरमधील स्ट्रेनमुळे केजरीवाल चिंतेत; केंद्राला केलं आवाहन

या स्ट्रेनमुळे भारतातील लहान मुलांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता
Arvind Kejriwal
Arvind Kejriwalfile photo
Updated on

नवी दिल्ली : सिंगापूरमध्ये (Singapore) कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन (corona new strain) आढळून आला आहे. या स्ट्रेनचं वैशिष्ट्य म्हणजे हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक असून भारतात तो तिसऱ्या लाटेच्या स्वरुपात दाखल होऊ शकतो. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच केंद्रानं याबाबत तात्काळ आवश्यक पावलं उचलण्याचं आवाहनही केलं. (Kejriwal worried over strain appeared in Singapore appealed to the Center)

केजलीवालांनी ट्वीटद्वारे म्हटलं, "सिंगापूरमध्ये आलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन हा लहान मुलांसाठी अत्यंत धोकादायक असल्याचं सांगण्यात येत आहे. भारतात हा स्ट्रेन कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या स्वरुपात दाखल होऊ शकतो. त्यामुळे माझं केंद्र सरकारला आवाहन आहे की, सिंगापूरसोबतची भारताची हवाई सेवा तात्काळ प्रभावानं स्थगित करण्यात यावी. त्याचबरोबर लहान मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लस देता येईल का? याबाबत प्राधान्याने काम व्हावं."

Arvind Kejriwal
'बायडेन यांचे हात रक्ताने माखलेले'

दरम्यान, एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार सिंगापूरचे आरोग्य मंत्री आँग ए कुंग यांनी म्हटलं की, "B1617 या कोरोना स्ट्रेनला भारतीय डबल म्युटेंट व्हेरियंट मानलं जात आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा भारतात आढळून आला होता. हा व्हेरियंट लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असल्याचं दिसून आलं आहे. पण यामुळे किती लहान मुलांवर त्याचा परिणाम झाला आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सिंगापूरमधील शैक्षणिक संस्था राहणार बंद

"कोरोनाचे काही म्युटेशन्स खूपच जहरी आहेत. हे स्ट्रेन लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम करत आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सिंगापूरमधील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा आणि ज्युनिअर कॉलेजेस बंद ठेवण्यात येणार असून बुधवारपासून घरातून शिक्षण सुरु केलं जाणार आहे. २८ मेपर्यंत शाळाचं सत्र असेपर्यंत हे शिक्षण सुरु राहिल," असं सिंगापूरचे शिक्षण मंत्री चान चून सिंग यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.