Kerala: केरळचे नाव बदलणार! विधानसभेने मंजूर केला ठराव, मुख्यमंत्र्यांनी केंद्राला केली 'ही' विनंती

Pinarayi Vijayan On Kerala Name Change
Pinarayi Vijayan On Kerala Name Change
Updated on

Pinarayi Vijayan On Kerala Name Change: केरळचे नाव बदलून ते ‘केरळम्’ करण्याची विनंती केंद्र सरकारला करण्याचा ठराव मुख्‍यमंत्री पिनराई विजयन यांनी बुधवारी विधानसभेत मांडला. राज्यघटना आणि अन्य सरकारी कागदपत्रांमध्ये हा बदल करण्याची विनंती या ठरावाद्वारे केली आहे.

मल्याळी भाषेत आमच्या राज्याचे नाव ‘केरळम्’ आहे. भाषानिहाय प्रांतानुसार राज्याची स्थापना १ नोव्हेंबर १९५६ मध्ये झाली होती. त्याच दिवशी ‘केरळ दिन’ साजरा होतो. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या काळापासूनच मल्याळी भाषिक समुदायांना केरळसाठी एकत्र येण्याची गरज वाटत होती. मात्र राज्यघटनेची पहिल्या अनुच्छेदात राज्याचे ‘केरळ’ असे नाव नोंदण्यात आले, असे ठरावात म्हटले आहे.

राज्यघटनेचे कलम ३ अंतर्गत राज्याच्या नावात ‘केरळ’ऐवजी ‘केरळम्’ अशी दुरुस्ती करण्याची एकमुखी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्यघटनेच्या आठव्या अनुच्छेदात नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये आमच्या राज्याचे ‘केरळम्’ असे नामकरण करावे, अशी विनंतीही हे सभागृहाने केली आहे.

केंद्र सरकारला केली विनंती-

विजयन म्हणाले, "ही विधानसभा एकमताने केंद्र सरकारला घटनेच्या कलम 3 अंतर्गत राज्याचे नाव बदलण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची विनंती करते. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या सर्व भाषांमध्ये राज्याचे नाव 'केरळम' असे ठेवावे." (Latest Marathi News)

Pinarayi Vijayan On Kerala Name Change
Earthquake in Himachal Pradesh: हिमाचल प्रदेशातील लाहौल-स्पीतीमध्ये भूकंप, ३.४ रिश्टर स्केल तिव्रता

कोणत्याही पक्षाने विरोध केला नाही

विशेष म्हणजे हा प्रस्ताव विधानसभेने एकमताने मंजूर केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने त्याला विरोध केला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटने (यूडीएफ) त्यात कोणतीही दुरुस्ती सुचवली नाही.

यूसीसीच्या विरोधात ठरावही मंजूर

यापूर्वी मंगळवारी केरळ विधानसभेने समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेविरोधात ठराव मांडला होता. UCC बाबत मुख्यमंत्र्यांनी संघ परिवारावर निशाणा साधला होता आणि संघाने कल्पना केलेली UCC संविधानानुसार नसून 'मनुस्मृती'वर आधारित असल्याचे सांगितले होते.

Pinarayi Vijayan On Kerala Name Change
No Confidence Motion Debate: लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर PM मोदी आज देणार उत्तर, जाणून घ्या प्रमुख मुद्दे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.