Kerala Blast : केरळमधील प्रार्थना सभेदरम्यान लागोपाठ स्फोट; एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

या घटनेत किमान एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Kerala blast Update one person died several injured in an explosion at a Convention Centre in Kalamassery
Kerala blast Update one person died several injured in an explosion at a Convention Centre in Kalamassery
Updated on

केरळमधील एर्नाकुलम येथील एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये रविवारी सकाळी भीषण स्फोट झाला. या घटनेत किमान एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

कलामासेरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्व्हेन्शन सेंटरमध्ये प्रार्थना सभेसाठी अनेक लोक जमले असताना हा स्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला स्फोट सकाळी नऊच्या सुमारास झाला. पुढच्या काही मिनिटांत एकामागून एक स्फोट झाले. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तब्बल तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले असून मृतांचा आकडा वाढू शकतो.

या तीन दिवसीय प्रार्थना सभेचा रविवारी शेवटचा दिवस असल्याचे सांगण्यात येत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट झाला तेव्हा प्रार्थना सभेत सुमारे दोन हजार लोक जमले होते. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज के यांनी सांगितले की, त्यांनी कलामासेरी स्फोटाबाबत सर्व रुग्णालयांना सतर्क केले आहे. तसेच रजेवर गेलेल्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. आम्ही घटनेची सविस्तर माहिती गोळा करत आहोत. सर्व उच्च अधिकारी एर्नाकुलममध्ये पोहचले आहेत. डीजीपी घटनास्थळी जात आहेत. आम्ही ही घटना अतिशय गांभीर्याने घेत आहोत. मी डीजीपीशी बोललो आहे. तपासानंतर आम्हाला अधिक तपशील मिळीले अशी प्रतिक्रिया केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()