Kerala Blast: केरळमधील व्यक्तीने घेतली बॉम्बस्फोटाची जबाबदारी, पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण; UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Kerala Blast-update
Kerala Blast-update
Updated on

Kerala Blast:  केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील कलामस्सेरी येथील ख्रिस्ती समाजाच्या प्रार्थनासभेमध्ये आज झालेल्या साखळी स्फोटांमध्ये एकजणाचा मृत्यू झाला तर अन्य ५६ जण जखमी झाले आहेत. सामूहिक प्रार्थनेला सुरूवात झाल्यानंतर अवघ्या मिनिटाभराच्या अवधीत हे तीन स्फोट झाले. ज्या ठिकाणी ही घटना घडली ते प्रार्थनास्थळ हे कोचीपासून दहा किलोमीटर अंतरावर असून या सामूहिक प्रार्थनेला तब्बल दोन हजार नागरिक उपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान या बॉम्बस्फोटाची जबाबदारी एका व्यक्तीने घेतली आहे. या व्यक्तीने डोमिनिक मार्टिन असे आपले नाव उघड केले आहे. डोमिनिकने कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तीन बॉम्ब पेरल्याचा दावा केला आहे कलमसारी अतिरिक्त पोलीस महासंचालक अजित कुमार यांनी दिली.

कडवंथरा मूळचा डॉमिनिक मार्टिन याने बॉम्ब पेरले होते. ज्याचा सकाळी कलामासेरी येथील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला. पोलिसांना डॉमिनिकच्या फोनवर आयईडीचा स्फोट करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रिमोट कंट्रोलचे व्हिज्युअल सापडले, केरळ पोलिसांनी ही माहिती दिली.

डोमिनिक मार्टिन याने कोडकरा पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण करण्यापूर्वी फेसबुक लाइव्हवर गुन्ह्याची कबुली दिली. व्हिडिओमध्ये डॉमिनिक म्हणाला, "ख्रिश्चन संप्रदायाने द्वेषाला प्रोत्साहन देणारे मार्ग बदलण्यासाठी अनेक विनंत्या करूनही त्यांनी तसे करण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांनी बॉम्ब ठेवण्याचा निर्णय घेतला."

पोलिसांनी डॉमिनिक मार्टिनवर इतर गंभीर आरोपांसह UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला. डोमिनिक मार्टिन याने त्रिशूर ग्रामीणमधील कोडकारा पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले आहे. पोलीस त्याची पडताळणी करत आहे. तपासात या प्रकरणातील सर्व पैलूंवर लक्ष ठेवले जात आहे.

Kerala Blast-update
Shubha Poonja: शुटिंग सुरु असतानाच लोकप्रिय अभिनेत्रीसोबत गुंडांनी केलं गैरवर्तन, चाकुचा धाक दाखवून...

या व्यक्तीने 'जेहोवाज विटनेस' या ख्रिश्चन धार्मिक गटाचा अनुयायी असल्याचा दावाही केला आहे. हा गट 19व्या शतकात अमेरिकेत स्थापन झाला.पोलीस दलाच्या सर्व शाखा प्रभावीपणे काम करत आहेत, असे अजित कुमार यांनी सांगितले. (Latest Kerala News)

प्राथमिक तपासानुसार, स्फोटके टिफिनमध्ये ठेवण्यात आली होती आणि पहिला स्फोट सकाळी 9.40 वाजता झाला. यामध्ये आयईडीचा वापर करण्यात आल्याचे केरळचे डीजीपी म्हणाले.

दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या भेटीत ते बॉम्बस्फोटांवर चर्चा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही यासंबंधी माहिती गोळा करण्यात व्यस्त आहोत. आम्ही हे अतिशय गांभीर्याने घेत आहोत.

Kerala Blast-update
Maratha Reservation: आरक्षण नको पाणी घ्या; मराठा आंदोलकांची मनोज जरांगेंना भावूक होत विनंती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.