Thiruvananthapuram: ‘‘नोकरीत फसवणूक झाल्यानंतर रशियामध्ये अडकून पडलेल्या केरळी नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत,’’ अशी विनंती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केंद्र सरकारला केली आहे.
रशिया-युक्रेन युद्धात एका ड्रोन हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संदीप चंद्रन या केरळी नागरिकाचा मृतदेह परत आणण्यासाठीही केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लिहिले आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदना म्हटले आहे की, रशियातील भारतीय दूतावासाने संदीप चंद्रन यांचा मृतदेह रोस्तोव्ह या शहरात ठेवण्यात असल्याचे विजयन यांनी जयशंकर यांना लिहिलेल्या पत्रात सांगितले आहे. संदीप यांचा मृतदेह परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने व्यवस्था करावी, अशी विनंती विजयन यांनी केली आहे.
तसेच, चार केरळी नागरिक रशियातील लुहान्स्क येथे लष्करी छावणीत अडकून पडले आहेत. ते अत्यंत धोकादायक वातावरणात असून त्यांनाही तातडीने माघारी आणणे आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.