Pinarayi Vijayan: धर्मनिरपेक्ष संसदेला धार्मिक बनवण्याचा प्रयत्न; केरळच्या मुख्यमंत्र्यांची टीका

Pinarayi Vijayan
Pinarayi Vijayan
Updated on

Kerala CM Pinarayi Vijayan : द केरळ स्टोरी या चित्रपटानंतर केरळ राज्य राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. अनेक नेत्यांनी केरळमधील परिस्थितीवर प्रश्न उपस्थित केले. दरम्यान केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन तिरुअनंतपुरम येथे एका कार्यक्रमात बोलताना जोरदार पलटवार केला आहे. तसेच त्यांनी मोदी सरकारवर टीका केली.

पिनराई विजयन म्हणाले, केरळ ही धर्मनिरपेक्षतेची भूमी आहे, काही राज्यांप्रमाणे येथे कोणताही जातीय तणाव नाही. संसद हे धर्मनिरपेक्ष ठिकाण आहे, पण काही लोक त्याला धार्मिक बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते देशातील धर्मनिरपेक्षता नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Pinarayi Vijayan
CM Eknath Shinde : कोस्टल रोडवरील दुसरा बोगदा खणन्याचा अखेरचा टप्पा पूर्ण; 'सागरी किनारा प्रकल्प दिलासा देणारा'

स्वातंत्र्यलढ्यात सगळे एकत्र आले आणि एक होऊन लढले. ज्यांनी स्वातंत्र्यलढ्यात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तेच आता देशावर राज्य करत आहेत, अशी टीका पिनराई विजयन यांनी मोदी सरकारवर केली आहे.

केंद्र सरकार केरळला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याच्या कर्ज मर्यादेवर नुकतेच लागू करण्यात आलेले नियंत्रणातून हे स्पष्ट होते,असे देखील केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी म्हटले आहे.

Pinarayi Vijayan
Narendra Modi : रायगडावर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी PM मोदींचा संदेश ऐकवणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()