Kerala : विझिंगम येथील बंदराचे उद्‍घाटन

देशातील पहिल्या संपूर्ण स्वयंचलित ट्रान्शिपमेंट बंदराच्या टर्मिनलचे उद्‍घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल हे देखील उपस्थित होते.
Kerala
Kerala sakal
Updated on

तिरुअनंतपुरम : देशातील पहिल्या संपूर्ण स्वयंचलित ट्रान्शिपमेंट बंदराच्या टर्मिनलचे उद्‍घाटन केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल हे देखील उपस्थित होते.

तमिळनाडू येथील विझिंगम येथे बांधण्यात आलेल्या या मदर पोर्टवर अर्थात मोठ्या बंदरावर मोठ्या जहाजांतील कंटेनर उतरवून घेण्याची आणि ते बदलण्याचे सोय आहे. या बंदरावर गुरुवारी चीनहून आलेले मालवाहू जहाज सॅन फर्नाडो हे जहाज पहिल्यांदा दाखल झाले. पाण्याचे फवारे मारून या जहाजाचे स्वागत करण्यात आले. मालवाहू जहाज सॅन फर्नाडो हे एक हजारांपेक्षा अधिक कंटेनर घेऊन विहिंजम बंदरावर आले.

या बंदराची निर्मिती आणि बांधणी अदानी समूहाची कंपनी अदानी पोटर्स ॲड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडकडून करण्यात आली आहे. या प्रकल्पावरून केरळ सरकार आणि अदानी पोर्ट्स कंपनी यांच्यात करार झाला आणि त्यानुसार या प्रकल्पाचे काम ५ डिसेंबर २०१५ रोजी अदानी पोर्ट्सने सुरू केले. या बंदर उभारणीसाठी सुमारे ८,८६७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून यापैकी ५,५९५ कोटी केरळ सरकारने तर केंद्र सरकारने ८१८ कोटी रुपयांचा निधी दिला. विंझिगम या बंदराची निर्मिती खासगी आणि सार्वजनिक भागीदारीतून करण्यात आली आहे.

थरूर यांचा बहिष्कार

तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर हे या कार्यक्रमाला अनुपस्थित होते. या बंदराच्या निर्मितीमुळे ज्या मच्छीमारांचे नुकसान झाले आहेत त्यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यात आलेली नसल्याचा दावा करत याचा निषेध म्हणून थरूर या कार्यक्रमाला गैरहजर राहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com