पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून हत्या; पतीला न्यायालयाने ठरवलं दोषी

court
courtsakal
Updated on
Summary

२५ वर्षांच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला. त्यानंतर सर्पदंश करवून तिची हत्या करण्यात आली.

तिरुवनंतपूरम - केरळमधील एका न्यायालयाने पत्नीला सर्प दंश करवून मारल्याप्रकरणी पतीला दोषी ठरललं आहे. पत्नीला सर्प दंश करवून तिची हत्या केल्या प्रकरणी केरळमधील न्यायालयाने निकाल दिला. शिक्षेची सुनावणी १३ ऑक्टोबरला करण्यात येईल असेही न्यायालयाने सांगितले. केरळमधील सूरज नावाच्या व्यक्तीवर आरोप होता की, त्याने २५ वर्षांच्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केला. त्यानंतर सर्पदंश करवून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी कोल्लम सत्र न्यायालयाने सोमवारी केली. कोल्लमपासून ४० किमी अंतरावर असलेल्या माहेरी उथरा राहत होती. तिला झोपेत कोब्राचा दंश झाला होता. त्यात तिचा मृत्यू झाला. ही घटना ७ मे २०२० मध्ये घडली होती. सूरज आणि उथरा यांच्या लग्नाला तेव्हा दोन वर्षे झाली होती. दोघांना एक लहान मुलगासुद्धा आहे.

सूरज एस कुमार याच्यावर फिर्यादींनी असा आरोप केला की, त्यानेच खोलीमध्ये कोब्रा सोडला होता. पत्नीची हत्या करण्यासाठी त्याने जाणीवपूर्वक हे कृत्य केले. तसंच कट रचण्याआधी त्यानं पत्नीला झोपेच्या गोळ्यासुद्धा दिल्या होत्या. चौकशीत अशीही माहिती समोर आली आहे की, गेल्या वर्षी २ मार्चलासुद्धा सूरजने पत्नीला ठार मारण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.

पतीच्या घरी असताना २ मार्च रोजी सर्प दंश झाल्यानं उथरावर एका खासगी मेडिकल कॉलेजमध्ये १६ दिवस उपचार सुरु होते. यामुळे ती जवळपास ५२ दिवस अंथरुणावर होती. तिच्यावर प्लास्टिक सर्जरीसुद्धा करण्यात आली होती. उथराच्या आईने म्हटलं की, मुलगी आणि सूरज दोघेही जेवणानंतर झोपण्यासाठी गेले होते. सूरज उशिरा उठत होता, पण त्यादिवशी तो लवकर उठून बाहेर गेला होता. तर उथरा मात्र तिच्या नेहमीच्या वेळेत जागी झाली नव्हती. तिच्याजवळ गेल्यावर ती बेशुद्धावस्थेत आढळली होती. त्याठिकाणी कोब्रा आढळला होता.

court
नाटकात रंगमंचावरच कलाकाराचा मृत्यू; प्रेक्षकांना वाटलं 'सीन' सुरुय

सूरजला जवळपास १० लाख रुपये हुंडा, मालमत्ता, नवीन कार आणि सोन्याचे दागिनेसुद्धा दिले होते. दोन वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर दोघांमध्ये वाद व्हायला लागले. यातच त्याने आणखी हुंडा मागायला सुरुवात केली होती. उथराच्या मृत्यूवर तिच्या कुटुंबियांकडून संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर सूरजला २४ मे रोजी अटक करण्यात आली होती. १२ जुलै रोजी सूरजने आपण साप पकडणाऱ्याला दोन वेळा दहा हजार रुपये देऊन साप खरेदी केल्याचं मान्य केलं होतं. या प्रकरणाची चौकसी पूर्व ग्रामीण एसपी एस हरिशंकर यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.