Kerala : 'मी त्यांची नियुक्ती केलीय'; संविधानाचा दाखला देत राज्यपालांनी मंत्र्यांना फटकारलं

'पंजाबच्या जागी केरळ आता ड्रग कॅपिटल बनत आहे.'
Governor Arif Mohammad Khan
Governor Arif Mohammad Khanesakal
Updated on
Summary

'पंजाबच्या जागी केरळ आता ड्रग कॅपिटल बनत आहे.'

केरळमध्ये डावे सरकार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Governor Arif Mohammad Khan) यांच्यात संघर्ष सुरूच आहे. केरळ सरकार (Kerala Government) आणि राज्यपाल हे विद्यापीठांमधील नियुक्त्यांसह सर्व मुद्द्यांवर समोरासमोर येत आहेत.

आता एका पुस्तकाच्या अनावरणप्रसंगी आरिफ मोहम्मद खान यांनी केरळचे कायदा मंत्री आणि अर्थमंत्र्यांना सल्ला दिलाय. आरिफ खान म्हणाले, 'मंत्र्यांनी संविधानाचे नियम विसरू नयेत.' नुकतेच केरळच्या कायदामंत्र्यांनी राज्यपालांच्या निर्णयाचा आढावा घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यावर राज्यपाल म्हणाले, मी मंत्र्यांची नियुक्ती केलीय. त्यामुळं त्यांनी संविधानाच्या (Constitution) नियमांचं पालन करावं. मी त्यांच्या कामांचं पुनरावलोकन करण्यासाठी इथं आलोय, ते माझ्या कामाचं पुनरावलोकन करू शकत नाहीत, असं त्यांनी मंत्र्यांना सुनावलं.

Governor Arif Mohammad Khan
Reservation : निवडणुकीपूर्वी काश्मीरमध्ये मोठा बदल; पाकिस्तानी निर्वासितांसह 15 जातींना मिळणार 'आरक्षण'

मंत्र्यांवर ताशेरे ओढत राज्यपाल म्हणाले, 'कायदामंत्री माझ्या कामाचा आढावा घेणार असल्याचं सांगत आहेत. राज्यपाल म्हणून मी त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी इथं आलोय. मी मंत्र्यांची नियुक्ती केलीय. याचा अर्थ, त्यांना राज्यघटनेच्या नियमांची माहिती नसावी. कारण, हुशार लोक बाहेर जातात, म्हणूनच अज्ञानी लोक इथं राज्य करतात.'

Governor Arif Mohammad Khan
NCP : आमदार शिंदेंचा पराभव जिव्हारी लागलाय, त्याचा वचपा जरुर काढणार; रामराजेंची भरसभेत ग्वाही

आरिफ मोहम्मद खान यांनी केरळचं वर्णन ड्रग कॅपिटल असं केलंय. पंजाबच्या जागी केरळ आता ड्रग कॅपिटल बनत आहे. कारण, राज्य सरकार दारूची विक्री वाढवत आहे. साक्षरतेचं प्रमाण 100 टक्के असलेल्या राज्यासाठी हे किती लाजिरवाणं आहे. मला लाज वाटते की, आपल्या राज्याच्या उत्पन्नाचा स्रोत दारू आणि लॉटरी आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.