'मुख्यमंत्र्यांना पदावरुन काढून टाकण्याचा अधिकार माझ्याकडं नाही, पण..'
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Kerala Governor Arif Mohammad Khan) यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) अजेंड्याचा प्रचार केल्याचा आरोप झाल्यानंतर ते चांगलेच भडकले आहेत.
त्यांनी आरोपांना चोख प्रत्युत्तर देत म्हटलंय, मी आरएसएसचा अजेंडा चालवत नाही. जर कोणी हा आरोप सिद्ध केला तर मी ताबडतोब राजीनामा देईन. गेली तीन वर्षे तुम्ही म्हणताय की, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबवत आहे. मला एक नाव द्या, फक्त एक उदाहरण द्या जिथं मी तुम्हाला राजकीय त्रास देणार्या कोणाचीही नियुक्ती केली आहे. RSS, BJP मधील एका व्यक्तीचं नाव सांगा ज्याची मी माझ्या अधिकाराचा वापर करून नियुक्ती केलीय, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
राज्यपाल खान पुढं म्हणाले, अर्थमंत्री म्हणताहेत की यूपीमध्ये जन्मलेल्या व्यक्तीला केरळची शिक्षण व्यवस्था कशी समजेल? प्रांतवाद आणि प्रादेशिकवादाची आग भडकवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. ते भारताच्या एकात्मतेला आव्हान देत आहेत. केरळमध्ये एखाद्यानं प्रांतवादाची ज्योत पेटवण्याचा प्रयत्न केला तर राज्याबाहेर काम करणाऱ्या केरळवासीयांवर याचा काय परिणाम होईल? असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना पदावरुन काढून टाकण्याचा अधिकार माझ्याकडं नाही. परंतु, मी केरळच्या लोकांच्या सेवेसाठी घेतलेली शपथ, माझं कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्यपाल आणि मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकार यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, डाव्या पक्षांनी मंगळवारी राज्याची राजधानी तिरुवनंतपुरममधील राजभवनावर निषेध मोर्चा काढला. यादरम्यान सीपीआयचे (एम) सरचिटणीस सीताराम येचुरी म्हणाले, राज्यपाल पद हे राज्य सरकारांविरुद्ध उभं ठाकलं आहे. शिक्षणावर नियंत्रण ठेवण्याचं हे प्रकरण या धर्मनिरपेक्ष लोकशाही भारताला फॅसिस्ट हिंदुत्ववादी राष्ट्र बनवण्यासाठी आणलं आहे. यातून भाजप-आरएसएसचा अजेंडा वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे फार काळ टिकणार नाही, असं म्हटलं होतं. त्याला राज्यपालांनी उत्तर दिलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.