कोची : वायनाडच्या विनाशकारी भूस्खलनात दोनशेहून अधिक लोकांचा बळी जाणे म्हणजे निसर्ग जोपासण्याबाबत मानवाची उदासीनता आणि लाेभीपणा या वृत्तीवर निसर्गाने केलेला प्रकोप आहे, अशा शब्दांत आज केरळच्या उच्च न्यायालयाने सरकारी व्यवस्थेवर ताशेरे ओढले. ३० जुलै रोजी वायनाड जिल्ह्यातील विनाशकारी भूस्खलनात तीन गावे जमीनदोस्त झाली.