अ‍ॅमेझॉनवरुन मागवला 70 हजाराचा iPhone; मिळाला साबण आणि पाच रुपयांचा कॉईन

अ‍ॅमेझॉनवरुन मागवला 70 हजाराचा iPhone; मिळाला साबण आणि पाच रुपयांचा कॉईन
Updated on

नवी दिल्ली: सध्या ऑनलाईन शॉपिंगचा जमाना आहे. कोरोना काळात तर ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, केरळमधल्या एका व्यक्तीला या ऑनलाईन शॉपिंगचा मोठा फटका बसला आहे. या व्यक्तीने अ‍ॅमेझॉनवरुन ऍपल आयफोन 12 मागवला होता मात्र, त्याला या ऑर्डरमध्ये जे मिळालं ते धक्कादायक होतं. या व्यक्तीला आयफोन मिळाला नाही तर त्याला साबणाची एक वडी आणि पाच रुपयांचा एक कॉईन मिळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नुरुल अमीन असं या व्यक्तीचं नाव आहे. नुरुल अमीन हा अ‍ॅमेझॉनचा नियमित ग्राहक असून त्याने 12 ऑक्टोबर रोजी 70,900 रुपये अ‍ॅमेझॉन पे कार्डद्वारे भरुन मोबाईलची ऑर्डर दिली होती. 15 ऑक्टोबर रोजी त्याला ही ऑर्डर प्राप्त झाली.

अ‍ॅमेझॉनवरुन मागवला 70 हजाराचा iPhone; मिळाला साबण आणि पाच रुपयांचा कॉईन
२५ कोटी डीलचा आरोप करणाऱ्या प्रभाकर साईलला पोलीस संरक्षण

मात्र, हैदराबादहून पाठवल्यानंतर पॅकेज एका दिवसासाठी सालेममध्ये थांबवल्यानंतर त्याला संशय वाटला होता. याचं कारण असं की, पॅकेजेस हैदराबादहून कोचीला दोन दिवसात आले मात्र, त्याच्या आयफोन 12 ऑर्डरला तीन दिवस लागले. त्याने अ‍ॅमेझॉन डिलिव्हरी पार्टनरसमोरच हा बॉक्स उघडला आणि तो उघडताना त्याने एक व्हिडिओ शूट केला.

त्यावेळी त्या पॅकेजमधून जे समोर आलं ते धक्कादायक होतं. त्यामध्ये विमचा एक डिश वॉशिंग बार होता तसेच पाच रुपयांचा कॉईन देखील होता. अमीनने लागलीच अ‍ॅमेझॉनच्या कस्टमर केअरला फोन लावला आणि पोलीसांमध्ये धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यांना 25 सप्टेंबरपासून झारखंडमध्ये कोणीतरी आयफोन वापरत असल्याचे आढळून आलं. अमीनने फोन बुक करण्यापूर्वी 15 दिवस आधीची ही घटना आहे.

अ‍ॅमेझॉनवरुन मागवला 70 हजाराचा iPhone; मिळाला साबण आणि पाच रुपयांचा कॉईन
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यतेसाठी दिल्ली HC मध्ये याचिका, सुनावणी सुरू

पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, “आम्ही Amazon चे अधिकारी आणि तेलंगणातील विक्रेत्यांशी संपर्क साधला. हा फोन झारखंडमध्ये या वर्षी 25 सप्टेंबरपासून वापरात आहे. जरी ऑर्डर ऑक्टोबरमध्ये दिली गेली असली तरी जेव्हा आम्ही विक्रेत्याशी संपर्क साधला, तेव्हा तो म्हणाला की फोन आऊट ऑफ स्टॉक असून नूरूलने दिलेली रक्कम त्याला परत केली जाईल. त्यानुसार अमीनला पैसे परत केले गेले आहेत, मात्र, हे असं कसं घडलं याबाबतचा तपास सध्या सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.