Crime News: सीटवरुन वाद, धावत्या रेल्वेत महिलेला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, 8 प्रवासी होरपळले

सीट पकडण्यावरुन झालेल्या वादावादीनंतर आरोपीने थेट रेल्वेचा डब्बाच पेटवून दिल्याची घटना घडली
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

केरळमध्ये धावत्या ट्रेनमधील एक थरारक घटना समोर आली आहे. कोझिकोड जिल्ह्यातील इलाथूर येथील एका अज्ञात व्यक्तीने सहप्रवाशाच्या अंगावर पेट्रोल टाकून चालत्या ट्रेनमध्येच पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये एका माय-लेकाचा समावेश आहे. एलाथुर येथील रेल्वे रुळांजवळ दोन मृतदेह सापडले असून या घटनेत आठ जण गंभीर जखमी आहेत.

घटनेमध्ये जखमी झालेल्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, आठपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अलप्पुझा-कन्नूर मुख्य कार्यकारी एक्स्प्रेसच्या डी१ डब्ब्यात रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोझिकोड येथे रविवारी अलप्पुझा - कन्नूर एक्झिक्युटिव्ह एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरुन दोन प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका विकोपाला गेला की एका प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाला पेटवून दिलं. पेटवून दिलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Crime News
Maharashtra Politics: अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये होणार मोठा भूकंप?

दरम्यान या अपघातात आठ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र ट्रेन ज्यावेळी कन्नूर स्टेशनवर पोहोचली तेव्हा प्रवाशांनी सांगितलं की घटनेनंतर एक महिला आणि एक मुलगा बेपत्ता आहे. त्यानंतर पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला. तब्बल चार तासांच्या शोध मोहिमेनंतर दोघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळुन आले आहेत.

ट्रेनमध्ये सुरु असलेल्या वादानंतर काही प्रवाशांनी इमर्जन्सी चैन ओढली. चेन ओढल्यानंतर ट्रेनचा स्पीड कमी झाला. त्यावेळी आरोपीने हीच संधी साधत रेल्वेतून उडी मारून पळ काढला. आरोपीची ओळख पटू शकली नाही. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.

Crime News
Pune Crime: घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पत्नीने केले पतीवर चाकूने वार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.