Kerala Onam Festival 2022 : ‘ओणम’साठी सजले केरळ'

निर्बंधमुक्त सण: बळीराजाचे घरांघरात स्मरण करणारा ओणम
Kerala Onam Festival 2022 Kerala govt ready for Onam
Kerala Onam Festival 2022 Kerala govt ready for Onamsakal
Updated on

तिरुअनंतपूरम : दक्षिण भारतात आणि विशेषतः केरळमध्ये उद्या (गुरुवार, ता. ८) ओणम सण उत्साहात साजरा केला जाणार आहे. मागील तीन वर्षानंतर पहिल्यांदाच हा सण निर्बंधमुक्त साजरा होत असल्याने आबालवृद्धांमध्ये उत्साह आहे. बळी राजाच्या समृद्ध आणि सामर्थ्यशाली राजवटीचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ‘ओणम’. केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात जिथे-जिथे मल्याळी नागरिक आहेत तिथे, जाती धर्माच्या भिंती दूर सारत ओणम उत्साहात साजरा करतात. दहा दिवस चालणाऱ्या या ओणमनिमित्त केरळमधील शबरीमला गुरुवायूर या मंदिरांसह विविध मंदिरात धार्मिक विधींचे आयोजन केले जाते, सांगीतिक कार्यक्रमांचे आणि खेळांचे आयोजन केले जाते. दरवर्षी दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात यावर्षी ३० ऑगस्टला झाली. हा उत्सव दहा दिवसांचा असला तरी पुढे महिनाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पौराणिक मान्यता

भारतीय पौराणिक मान्यतेनुसार या प्रदेशात पूर्वी बळी राजाचे अत्यंत समृद्ध राज्य होते. त्याच्यासाठी साक्षात विष्णूंनी वामन अवतार घेऊन बळीला तीन पावलांचे राज्य मागितले. आणि दोन पावलांत अवघे जग व्यापले. तेव्हा दानशूर बळीने तिसरे पाऊल ठेवण्यासाठी स्वतःचे मस्तक पुढे केले. त्यानंतर पाताळात गेलेला बळी राजा. दरवर्षी ओणम दिवशी आपल्या राज्यात येऊन प्रजाजनांना भेटतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे त्याच्या स्वागतासाठी ओणम हा सण साजरा केला जातो.

सांस्कृतिक महत्त्व

मल्याळी दिनदर्शिकेनुसार, चिंगम महिन्यात येणाऱ्या थिरुओणम नक्षत्रावर हा सण साजरा केला जातो. या उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे अथमला केरळमधील प्रत्येक घरात फुलांची रांगोळी काढण्यात येते. तसेच या सणानिमित्त विविध रुचकर खाद्यपदार्थ बनवले जातात. या उत्सवादरम्यान केरळमध्ये पारंपरिक संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच सणाचे औचित्य साधत केरळमधील प्रसिद्ध बोटींच्या शर्यतींचे आयोजन करण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()