Kerala : सावरकरांच्या पोस्टरवर लावलं म. गांधींचं पोस्टर; व्हिडिओ व्हायरल

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत हा प्रकार घडला आहे.
Gandhi_Savarkar2
Gandhi_Savarkar2
Updated on

कोची : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत एक वादग्रस्त प्रकार घडला आहे. ही यात्रा सध्या केरळमध्ये असून या ठिकाणी एका मैदानात लावलेल्या सावरकरांच्या पोस्टरवर महात्मा गांधीजींचं पोस्टर लावण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Gandhi_Savarkar2
भाजपच्या ऑपरेशन लोटससाठी CBI-ED एकत्र काम करताहेत - सिसोदिया

कोची शहरात हा प्रकार घडला असून या ठिकाणी एका मैदानात काँग्रेसच्यावतीनं सभेची तयारी सुरु असल्याचं दिसतं आहे. यामध्ये लांबलचक पोस्टर लावण्यात आलं आहे. या पोस्टरवर जुन्या नेत्यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामध्ये अबुल कलाम आझाद, रविंद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फोटोंचाही समावेश होता. पण सावरकर यांचा फोटो झाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

Gandhi_Savarkar2
PM CARES Fund : रतन टाटा पीएम केअर्स फंडाचे नवे ट्रस्टी

सावरकरांचा फोटो झाकण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी महात्मा गांधी यांचा फोटो त्यावर लावला. हा फोटो बदलतानाचा व्हिडिओ व्हायरलं झाला आहे. त्यामुळं राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चर्चेत आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.