Kerala : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर गुन्हा दाखल, धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप

Rajeev Chandrasekhar FIR : केरळ पोलिसांच्या सायबर सेलने स्वतःच ही एफआयआर दाखल केली आहे.
Rajeev Chandrasekhar FIR
Rajeev Chandrasekhar FIReSakal
Updated on

केंद्रीय आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्यावर केरळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक द्वेष पसरवणे आणि सार्वजनिक सुव्यवस्थेचे उल्लंघन करणे असे आरोप त्यांच्यावर ठेण्यात आले आहेत. पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे.

कोचीमधील बॉम्बस्फोट आणि मलप्पुरम जिल्ह्यातील एका इस्लामिक गटाने आयोजित केलेल्या हमास नेत्याच्या व्हर्चुअल कार्यक्रमाबाबत राजीव यांनी सोशल मीडियावर काही वक्तव्य केलं होतं. याबाबत केरळ पोलिसांच्या सायबर सेलने स्वतःच एफआयआर दाखल केली आहे.

Rajeev Chandrasekhar FIR
केरळ बॉम्बस्फोटात विदेशी विद्यार्थ्यांवर संशय? गुप्तचर विभागाची करडी नजर, परदेशी विद्यार्थींची मागवली यादी

राजीव चंद्रशेखर यांनी सोमवारी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर टीका केली होती. विजयन हे कट्टरपंथी घटकांबद्दल सहिष्णुता दाखवत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. "कट्टरपंथी घटकांचे तुष्टीकरण करण्याचा केरळचा इतिहास आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी इतिहासात हेच केलं आहे." असं चंद्रशेखर म्हणाले होते.

"मी कोणत्याही विशिष्ट समाजाबद्दल बोललो नाही. मी स्पष्टपणे हमासचा उल्लेख केला होता. पिनराई विजयन हे स्वतःच हमास आणि त्या समाजाला एकत्र जोडत असल्याचं दिसत आहे.." असंही चंद्रशेखर म्हणाले होते. (National News)

विजयन यांचं प्रत्युत्तर

केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनीदेखील चंद्रशेखर यांना प्रत्युत्तर दिलं होतं. "जे लोक विखारी आहेत, ते विष फेकणारच. एका केंद्रीय मंत्र्याने म्हटलं आहे, की मी तुष्टीकरणाचं राजकारण करत आहे, आणि इस्राइलच्या विरोधात आंदोलन करत आहे." असं म्हणत, त्यांनी नाव न घेता चंद्रशेखर यांच्यावर निशाणा साधला होता.

Rajeev Chandrasekhar FIR
Kerala Blast : केरळमधील प्रार्थना सभेदरम्यान लागोपाठ स्फोट; एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी

"ते एक मंत्री आहेत, त्यांनी कमीत कमी तपास यंत्रणांप्रति सन्मान दाखवायला हवा. या गंभीर घटनेचा तपास सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. तरीही ते काही लोकांवर निशाणा साधण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करत आहेत. ही वक्तव्ये त्यांच्या सांप्रदायिक अजेंड्यावर आधारित आहेत. मात्र, केरळकडे असा कोणताही अजेंडा नाही. केरळ नेहमीच सांप्रदायिकतेच्या विरोधात उभारलं आहे." असं विजयन म्हणाले होते.

कोचीमधील ब्लास्ट

रविवारी कोचीमध्ये एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाले होते. एका कन्व्हेंशन सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रार्थनेदरम्यान हे स्फोट झाले. यामध्ये 12 वर्षांच्या एका मुलीसह तिघांचा बळी गेला होता, तर कित्येक लोक जखमी झाले होते. यानंतर आरोपीने काही तासांमध्येच आत्मसमर्पण केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.