Kerala Nipah: केरळ प्रशासनाचे धाबे दणाणले, 14 वर्षाच्या मुलाला निपाहची लागण, किती आहे धोकादायक?

Kerala reported first nipah case: मुलगा मलप्पुर जिल्ह्यातील असून त्याच्यावर कोझिकोडे येथे उपचार सुरु आहेत. त्याला कोझिकोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
Nipah
Nipah
Updated on

Malappuram, Kerala: केरळ सरकारची चिंता वाढवणारी घटना घडली आहे. केरळमध्ये एका १४ वर्षीय मुलाला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे केरळ सरकार सक्रीय झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगा मलप्पुर जिल्ह्यातील असून त्याच्यावर कोझिकोडे येथे उपचार सुरु आहेत. त्याला कोझिकोडे मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्री विना जॉर्ज यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, जे कोणी मुलाच्या संपर्कात आले आहेत त्यांचा शोध घेण्यात येईल आणि त्यांना निगराणीखाली ठेवण्यात येईल. निपाहची लागण झाल्याची पुष्टी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीने केली आहे.

Nipah
Nipah : केरळहून परतलेल्या मजुरात निपाहची लक्षणे; पश्‍चिम बंगालमधील रुग्णालयात उपचार

मागील वर्षी केरळमध्ये निपाहमुळे २ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये निपाहच्या झालेल्या उद्रेकात २१ जणांचा जीव गेला होता. २०२१ मध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. निपाह हा वटवाघुळांनी खाल्लेल्या फळांमधून पसरतो असं सांगितलं जातं. पण, खात्रीशीरपणे फळांच्या माध्यमातूनच संसर्ग होतो असं सांगता येत नाही.

Nipah
Nipah Virus : 'निपाह' व्हायरस पसरण्याची कारणं काय ? फळांना व्हायरस बॉम्ब बनवतो हा फ्रूटबॅट..

जॉर्ज यांनी सांगितलं की, पुण्याच्या संस्थेने मुलाला निपाह झाल्याची खात्री केली आहे. सध्या त्याच्यावर एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. त्याला लवकरच कोझिकोडेमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल. निपाहचा संसर्ग झालेल्यांचा शोध सुरु आहे. मुलाच्या कुटुंबातील लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांची देखील टेस्ट करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट लवकरत येईल. तूर्तास, मुलाला वेन्टिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

निपाहची सर्वप्रथम लागण मलेशियातील सुंगई निपाह गावात १९९८ मध्ये झाली होती. त्यामुळेच या विषाणूला निपाह असे नाव पडले. निपाह झाल्यास ताप, डोकेदुखी, कफ, घसादुखी आणि श्वास घेण्यास अडथळा जाणवतो. निपाह विषाणूची लागण झाल्यास लक्षण दिसण्यास ४ ते १४ दिवस लागू शकतात. RT-PCR ची टेस्ट करून निपाह संसर्गाचे निदान करता येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.