'आरएसएस नेत्यांच्या जीवाला पीएफआयकडून धोका आहे.'
केरळमधील आरएसएस नेत्यांच्या (Kerala RSS leader) जीवाला पीएफआयकडून (PFI) धोका आहे, असं एनआयएच्या अहवालात उघड झालं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (National Investigation Agency) केंद्रीय गृहमंत्रालयाला ही माहिती दिली. या माहितीनंतर केंद्र सरकारनं केरळच्या 5 आरएसएस नेत्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
एनआयए आणि आयबीच्या अहवालाच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयानं केरळमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 5 नेत्यांना Y श्रेणीची सुरक्षा दिली आहे. आता त्यांच्या सुरक्षेत निमलष्करी दलाचे कमांडो तैनात करण्यात येणार आहेत.
वास्तविक, केरळमधील आरएसएसचे नेते पीएफआयच्या निशाण्यावर आहेत. केंद्रीय तपास यंत्रणेनं तसा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला होता. दरम्यान, 22 सप्टेंबर रोजी पीएफआय सदस्य मोहम्मद बशीर यांच्या घरावर छापेमारी करताना एनआयएला आरएसएस नेत्यांची यादी मिळाली, यामध्ये आरएसएसच्या 5 नेत्यांच्या हत्येचा कट होता. यामुळं केंद्रीय गृहमंत्रालयानं या पाच नेत्यांना वाय श्रेणीची सुरक्षा दिली आहे.
यलो बुक ऑफ सिक्युरिटीनुसार, गृह मंत्रालयाच्या Y श्रेणीच्या सुरक्षेत एकूण 8 सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ज्या व्हीआयपीला सुरक्षा दिली जाते, त्याच्या घरी 5 सशस्त्र स्टॅटिक गार्ड बसवले जातात. तसेच, तीन शिफ्टमध्ये तीन पीएसओ सुरक्षा देतात. दरम्यान, 28 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारनं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) आणि त्याच्या 8 संलग्न संघटनांवर 5 वर्षांसाठी बंदी घातली. एनआयएसह सर्व तपास यंत्रणांनी पीएफआयच्या ठिकाणांवर छापे टाकल्यानंतर सरकारनं हे पाऊल उचललं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.