Waynad Landslide: "केरळ सरकारला ७ दिवस आधीच...."; वायनाडच्या भूस्खलनाबाबत अमित शहांची राज्यसभेत खळबळजनक माहिती

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळं भूस्खलन झाल्यानं १२३ जण गाडले गेल्यानं मृत्यू झाला आहे.
Amit Shah
Amit Shah
Updated on

नवी दिल्ली : वायनाडमध्ये झालेल्या भूस्खलनात १६० हून अधिक जणांचा मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्यानं मृत्यू झाला आहे. या वर्षातील ही सर्वात भीषण दुर्घटना मानली जात आहे. या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी राज्यसभेत धक्कादायक माहिती दिली आहे.

सात दिवस आधीच इशारा दिला

शहा यांनी सांगितलं की, "केंद्र सरकारनं केरळ सरकारला या दुर्घटनेच्या संभाव्य धोक्याचा इशारा ७ दिवसांपूर्वी म्हणजेच २३ जुलै रोजीच देण्यात आला होता. या इशाऱ्यानंतर केरळ सरकारनं या ठिकाणावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवणं गरजेचं होतं. तसंच २४, २५ आणि २६ जुलै रोजी या भागात मुसळधार पाऊस, दरड कोसळण्याचा धोका तसंच चिखलाचा लोंढा वाहून येण्याचा इशारा दिला होता.

वायनाडमध्ये २० मीटरहून अधिक पावसाची शक्यता केंद्रीय हवामान खात्यानं वर्तवली होती. मुसळधार पावसामुळं होणाऱ्या संभाव्य धोक्यांची माहिती देणाऱ्या प्रणालीसाठी केंद्र सरकारनं २०१४ नंतर २००० कोटी रुपये खर्च केले आहेत. या यंत्रणेनं अचूक माहिती दिली होती, असंही शहा यांनी सभागृहात सांगितलं.

Amit Shah
Puja Khedkar: मोठी कारवाई! पूजा खेडकरची उमेदवारी रद्द, UPSCचा मोठा निर्णय; भविष्यातही देता येणार नाही परीक्षा

...तर जीवितहानी कमी झाली असती

दरम्यान, अमित शाहांनी पिनरायी विजयन यांच्या सरकारवर टीका केली आहे. पण केरळ सरकारनं काय केलं? नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हालवलं का? असा सवालही यावेळी अमित शहा यांनी राज्यसभेत विचारला. शहा पुढे म्हणाले, भारत जगातील चार देशांपैकी असा एक देश आहे जिथं नैसर्गिक आपत्तीबाबत कमीत कमी सात दिवस आधी इशारा देण्याची यंत्रणा आहे. त्यामुळं जर इशाऱ्यानंतर केरळ सरकारनं तातडीनं पावलं उचलली असती तर जीवितहानी कमी झाली असती. या घटनेपूर्वीच मदतीसाठी माझ्या आदेशानंच २३ जुलै रोजी केंद्राकडून NDRFच्या ९ तुकड्या बचाव आणि मदत कार्यासाठी पाठवल्या होत्या, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()