Wayanad Landslide: वरून पाऊस कोसळतोय, खालून जमीन फाटतेय! भूस्खलनामुळे हाहाकार

Kerala Landslide: बचाव कार्यासाठी अनेक पथके बाधित भागात पाठवण्यात आली आहेत. बाधित भागातील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, मोठ्या प्रमाणात लोक अडकल्याची भीती आहे.
Kerala Wayanad Landslide
Kerala Wayanad LandslideEsakal
Updated on

केरळमधील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी पहाटे मेपाडीजवळील विविध डोंगराळ भागात भूस्खलनामुळे शेकडो लोक अडकले आहेत.

आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार यामध्ये 43 जणांचा मृत्यू झाला आहे.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (KSDMA) सांगितले की, बचाव कार्यासाठी अनेक पथके बाधित भागात पाठवण्यात आली आहेत. बाधित भागातील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, मोठ्या प्रमाणात लोक अडकल्याची भीती आहे. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

दरम्यान ही घटना मंगळवारी पहाटे मेपाडीजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे 2 वाजता या भागात पहिले भूस्खलन झाला. त्यानंतर, पहाटे 4.10 च्या सुमारास जिल्ह्यात आणखी एक भूस्खलन झाले.

यानंतर अग्निशमन दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या तुकड्या बाधित भागात तैनात करण्यात आल्या आहेत, अतिरिक्त NDRF टीम वायनाडला जात आहे, अशी माहिती वृत्तसंस्था पीटीआयने दिली.

वृत्तसंस्था एएनआयने सांगितले की, हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक एमआय-17 आणि एक एएलएच, बचाव कार्यासाठी सुलूर येथून रवाना होतील.

Kerala Wayanad Landslide
Rahul Gandhi : महाभारताचा ‘चक्रव्यूह’ आता ‘पद्मव्यूह’;राहुल यांचे भाजपवर टीकास्त्र; अदानी, अंबानी पुन्हा लक्ष्य

एक्सवर काही युजर्सनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जिथे भूस्खलन झाले ती जागा दाखविण्यात आली आहे.

केरळ राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (KSDMA) च्या फेसबुक पोस्टनुसार, कन्नूर डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्सच्या दोन पथकांना बचाव कार्यात मदत करण्यासाठी वायनाडला जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

संततधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

Kerala Wayanad Landslide
Train Derailed: Howara-CSMT एक्स्प्रेस ट्रेनचे 18 डब्बे रुळावरून घसरले! दोघांचा मृत्यू, 25 जण जखमी

एका निवेदनात केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले, "वायनाडमधील भूस्खलनावर सर्व संभाव्य बचाव कार्यात समन्वय साधला जाईल."

"आम्हाला घटनेची माहिती मिळाल्यापासून सरकारी यंत्रणा बचाव कार्यात सहभागी झाल्या आहेत. मंत्री वायनाडला भेट देतील बचावकार्याचे नेतृत्व करतील," असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.