Crime news
Crime news

Crime News : बुरखा घालून मॉलच्या महिला शौचालयात घुसून बनवायचा व्हिडीओ; आयटी इंजिनियर अटकेत

Published on

कोची : केरळमधील एका लोकप्रिय मॉलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये बुरखा घालून प्रवेश करून फोनद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी २३ वर्षीय आयटी इंजिनियरला अटक करण्यात आली आहे. लुलू मॉलमध्ये बुधवारी ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

Crime news
Vijay Wadettiwar : भरत गोगावलेंच्या विधानाने सत्तेची साठमारी दिसून आली; वडेट्टीवारांचा हल्लाबोल

आरोपी, बी.टेक-ग्रॅज्युएट असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 354C, 419 आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66E अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

त्यानंतर, त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तिथे त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, असे कलामासेरी पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. इन्फोपार्क येथील एका नामांकित माहिती तंत्रज्ञान (आयटी) कंपनीत काम करणारा आरोपी बुधवारी 'बुरखा' परिधान करून लुलू मॉलमधील महिलांच्या वॉशरूममध्ये घुसला होता. तिथे त्यांने आपला मोबाइल ठेवला होता, असं पलिसांनी सांगितलं.

Crime news
Bacchu Kadu: निमंत्रण नाही, शिंदेंच्या जेवणाला जाणारही नाही! बच्चू कडू यांनी डिनरचं स्वतःच दिले स्पष्टीकरण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने आपला फोन एका छोट्या 'कार्डबोर्ड बॉक्स'मध्ये ठेवला, व्हिडिओ बनवण्यासाठी त्यात छिद्र केले आणि तो टॉयलेटच्या दारावर चिकटवला. यानंतर आरोपी तेथून बाहेर आला आणि शौचालयाच्या मुख्य दरवाजासमोर उभा राहिला.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी महिलेच्या वेशात जावून आपल्या मोबाईलने टॉयलेटचा व्हिडिओ बनवत असल्याचे आढळून आले. यानंतर आरोपीचा बुरखा आणि मोबाईल जप्त करून त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपींने यापूर्वीही अशा प्रकारची कृत्ये केली होती का, याचा शोध पोलीस घेत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()