Social Mediaवर अपमानास्पद टिप्पणी केली तरीही SC/ST कायद्यांतर्गत कारवाई - Kerla HC

केरळमधील एका युट्यूबरने याप्रकरणी जामीन अर्ज केला होता.
Kerla High Court
Kerla High CourtSakal
Updated on

तिरूवअनंतपूरम : सोशल मीडियावर एखाद्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जामातीमधील एखाद्या व्यक्तींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केली तर त्याच्यावर एससी एसटी कायद्यांतर्गत कारवाई होऊ शकते असा निर्णय केरळ उच्च न्यायालयाने दिला आहे. केरळमधील एका युट्यूबरने याप्रकरणी जामीन अर्ज केला होता. कोर्टाने हा अर्ज फेटाळून लावत हा निर्णय दिला आहे.

(SC/ST Act Kerla High Court)

केरळ उच्च न्यायालयाने सोशल मीडियाबाबत मोठा निर्णय दिला असून एखाद्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जातीवाचक टिप्पणी केली तर त्यावर कारवाई होणार आहे. दरम्यान, एसटी समाजातील एका तरूणीने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणावर निकाल देताना, डिजिटल युगात असे प्रकार सातत्याने घडत असतात असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने निकालासोबतच आरोपीचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.

Kerla High Court
राष्ट्रवादी निवडणुकीसाठी तयार; पण कोर्टाच्या निकालावर पवारांची चिंता

दरम्यान, पीडित महिलेच्या पती आणि सासऱ्याच्या मुलाखतीदरम्यान एसटी समाजातील एका महिलेविरोधात अपमानास्पद टिप्पणी करण्यात आली होती. त्यामुळे या महिलेने या प्रकाराची तक्रार दाखल केली होती. तर युट्यूबरने सांगितलं होते की, मुलाखतीदरम्यान सदर महिला उपस्थित नव्हती, त्यामुळे याप्रकरणात एससी एसटी कायद्यातील तरतूदी लागू होत नाहीत. त्यानंतर पीडितेच्या वकिलांनी सांगितलं की सदर युट्यूबरने सार्वजनिकरित्या महिलेच्या जातीवरून टिप्पणी केली आहे. या युक्तिवादानंतर कोर्टाने आपला निकाल जाहीर केला करत युट्यूबरचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.