Amritpal Singh: कट्टरपंथी संघटना 'वारीस पंजाब दे'चे प्रमुख आणि खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आणि त्याच्या नऊ साथीदारांच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी आसाम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
आसाम पोलिसांनी दिब्रुगड सेंट्रल जेलचे अधीक्षक निपेन दास यांना अटक करण्यात आली आहे. खलिस्तानी अमृतल सिंग आणि त्याच्या 9 सहकाऱ्यांच्या सुरक्षेमध्ये चूक केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. एवढेच नाही तर निपेन दास यांच्यावर यूएपीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याशिवाय त्याच्यावर गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी आणि आसाम कैदी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिब्रुगड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक (गुन्हे) सिजल अग्रवाल यांनी सांगितले की, निपेन दासला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.
दिब्रुगढ कारागृहाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (गुन्हे) सिजल अग्रवाल म्हणाले, हे प्रकरण सुरक्षेतील त्रुटीशी संबंधित आहे, जे गेल्या महिन्यात उघडकीस आले. तपासाअंती आम्ही निपेन दासला अटक केल्याचे त्यांनी सांगितले. येथे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत मुद्दा आहे. ते तुरुंगाचे प्रमुख होते. अशा परिस्थितीत सुरक्षेतील त्रुटींची जबाबदारी त्यांच्यावरच येते.
यापूर्वी आसामचे पोलीस महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी 17 फेब्रुवारी रोजी डिब्रूगड तुरुंगातील एनएसए सेलमधून अनेक बेकायदेशीर गॅजेट्स जप्त केल्याचा खुलासा केला होता. या गॅजेट्समध्ये स्पाय कॅम, स्मार्टफोन, पेन ड्राईव्ह, ब्लूटूथ आदींचा समावेश आहे. वारिस दे पंजाबचे प्रमुख अमृतपाल आणि त्यांच्या साथीदारांना या तुरुंगात ठेवण्यात आले आहे. (Latest Marathi News)
या घटनेनंतर पोलीस महासंचालकांनी 20 फेब्रुवारीला स्वतः तुरुंगाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी कारागृहातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. बैठकही झाली. डीजीपींच्या या बैठकीनंतर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्याही झाल्या. तसेच चौकशीचे आदेशही दिले. या तपासणीचे आदेश दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.