Amritpal Singh: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंहला पॅरोल मंजूर, ५ जुलैला घेणार लोकसभा सदस्यत्वाची शपथ

Amritpal Singh update news: अमृतपालचे कायदेशीर सल्लागार इमान सिंह खारा यांनी मंगळवारी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजयाची नोंद करणाऱ्या अमृतपालची एनएसएच्या कलम १५ अन्वये ९ जून रोजी तुरुंग अधीक्षकांमार्फत पंजाब सरकारकडे पाठविण्यात आली होती.
Amritpal Singh news
Amritpal Singh newsesakal

पंजाबमधील खडूर साहिब लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या अमृतपाल सिंहला ५ जुलैपासून चार दिवसांसाठी पॅरोल मंजूर करण्यात आले आहे. त्यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. अमृतपाल सिंह ५ जुलैला लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहे. यासाठी असमच्या डिब्रूगड जेल अधीक्षकांना सूचित करण्यात आले आहे. पंजाब सरकारने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अमृतपालच्या अस्थायी सुटकेसाठी निवेदन पाठवले होते.

अमृतपाल सिंहच्या वकिलांनी यापूर्वी एनएसएच्या धारा १५ अंतर्गत पॅरोलची मागणी केली होती. अमृतपाल सध्या तुरुंगात राहणार आहे. अमृतपालचे कायदेशीर सल्लागार इमान सिंह खारा यांनी मंगळवारी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत प्रचंड विजयाची नोंद करणाऱ्या अमृतपालची एनएसएच्या कलम १५ अन्वये ९ जून रोजी तुरुंग अधीक्षकांमार्फत पंजाब सरकारकडे पाठविण्यात आली होती.

दिब्रुगड तुरुंग अधीक्षकांनी हे पत्र अमृतसरच्या उपायुक्तांना पाठवले, त्यांनी ते राज्य सरकारच्या मुख्यालयात पाठवले. यानंतर राज्य सरकारने अमृतपाल यांना शपथ घेण्याची परवानगी देण्याची विनंती सभापतींना केली. NSA च्या कलम 15 नुसार, सरकारने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला कोणत्याही अटींशिवाय तात्पुरते सोडले जाऊ शकते किंवा कायद्याने विहित केलेल्या अटींवर आणि ती व्यक्ती स्वीकारते. याशिवाय त्याची सुटका केव्हाही रद्द होऊ शकते.

Amritpal Singh news
Manipur violence: "1993 मध्येही असाच हिंसाचार झाला होता, तेल ओतणाऱ्यांनी शांत बसा...."; PM नरेंद्र मोदी मणिपूरवर राज्यसभेत बोलले!

अमृतपाल सिंह यांचे आणखी एक वकील राजदेव सिंह खालसा म्हणाले, “पंजाबच्या गृहसचिवांनी सांगितले आहे की त्यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र पाठवले आहे. 25 जूनपासून सुरू होणाऱ्या 60 दिवसांच्या कालावधीत शपथविधीबाबत सभापती निर्णय घेऊ शकतात. नियमानुसार कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सभापती गृह विभागाचा सल्ला घेतात. पंजाब सरकारशी संबंधित सूत्रांनी याला दुजोरा दिला आहे."

Amritpal Singh news
Share Market Closing: गुंतवणूकदार मालामाल! शेअर बाजार विक्रमी उच्चांकाच्या जवळ बंद; कोणते शेअर्स वधारले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com