काश्मीरमध्ये पंडितांचं हत्यासत्र सुरुच; १९९० नंतर खोऱ्यात मोठं स्थलांतर

Jammu and Kashmir
Jammu and Kashmiresakal
Updated on
Summary

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) टार्गेट किलिंगच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीयत. येथील हिंदूंना दहशतवादी (Terrorist) सातत्यानं लक्ष्य करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंवर होत असलेल्या हल्ल्यांच्या घटनानंतर गुरुवारी अनेक हिंदू आणि काश्मिरी पंडितांनी (Kashmiri Pandit) काश्मीर सोडलंय. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

गुरुवारी मुळचे राजस्थानी असलेल्या एका बँक कर्मचाऱ्याची आणि एका बिहारी कर्मचाऱ्याची काश्मिरीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यानंतर काश्मीरमधील 30 ते 40 कुटुंबांनी काश्मीर सोडलं आहे, असं वृत्त एएनआयनं (ANI) दिलंय. सरकारी कर्मचारी अमित कौल यांनी एएनआयला ही माहिती दिलीय.

Jammu and Kashmir
काश्मिरात आणखी एका हिंदूची हत्या; दहशतवाद्यांनी बँक मॅनेजरला घातल्या गोळ्या

आताचा काश्मीर हा 1990 पेक्षा धोकादायक आहे. आम्हाला आमच्या कॉलनीमध्ये का कोंडून ठेवलं आहे. प्रशासन आपले अपयश झाकत आहेत, अशी प्रतिक्रिया तेथील एका हिंदूनं दिलीय. अशू नावाच्या एका व्यक्तीनं सांगितलं की, 'इथं सुरक्षा कर्मचारीही सुरक्षित नाहीत. अशा स्थितीत सामान्य नागरिकांनी आपली सुरक्षा कशी करायची? अनेक कुटुंब श्रीनगर सोडत आहेत.' काश्मिरी पंडित संघर्ष समितीचे (Kashmiri Pandit Samiti) अध्यक्ष संजय टिक्कू यांनी एएनआयच्या वृत्ताला दुजोरा दिलाय, अशी बातमी हिंदुस्तान टाईम्सनं दिलीय. जवळपास 65 कुटुंबांनी काश्मीर सोडलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Jammu and Kashmir
RTI कार्यकर्त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या; हत्याकांड घडताच परिसरात खळबळ

खोऱ्यात दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला

  • 31 मे - कुलगाममधील गोपालपोरा इथं दहशतवाद्यांनी एका हिंदू शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या केली.

  • 25 मे 2022 - काश्मिरी टीव्ही कलाकार अमीरा भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या.

  • 24 मे 2022- दहशतवाद्यांनी पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी जखमी झाली आहे.

  • 17 मे 2022 - बारामुल्ला येथील एका वाईन शॉपवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात रणजित सिंह यांचा मृत्यू झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले होते.

  • 12 मे 2022 - काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची बडगाममध्ये गोळ्या झाडून हत्या. दहशतवाद्यांनी त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार केला.

  • 12 मे 2022- पुलवामा इथं पोलीस शिपाई रियाझ अहमद ठाकोर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

  • 9 मे 2022 - शोपियानमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक नागरिक ठार झाला, तर एका जवानासह दोघे जखमी झाले.

  • 2 मार्च 2022 - कुलगाममधील संदू इथं दहशतवाद्यांनी पंचायत सदस्याची गोळ्या झाडून हत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.