शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या आणि त्यांचे पूत्र नील ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर सोमय्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यासाठी त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन रश्मी ठाकरे यांच्याशी निगडीत कागदपत्र प्रसिद्ध करून खुलासा केला आहे. (Kirti Somaiya Alleges Rashmi Thackeray)
अलिबागच्या बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे यांच्या नावे भरण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. ते बंगले ठाकरेंशी संबंधित नव्हते तर, मालमत्ता कर का भरला, असा प्रश्न सोमय्यांनी उपस्थित केला. मला जोड्यांनी का मारणार, असं ते म्हणाले. यावमध्ये रश्मी ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांच्याशी संबंधित माहिती समोर आणली आहे. संबंधित बंगले असणाऱ्या ग्रामपंचायतींची रश्मी ठाकरेंनी माफी मागितल्याचं त्यांनी म्हटलंय. (Kirit Somaiya on Sanjay Raut)
काय म्हणाले सोमय्या?
मी त्या जागेवर घेऊन जातो, बंगले दिसले तर माफी मागू, किरीट सोमय्यांना जोड्याने मारण्याची बात आहे की रश्मी उद्धव ठाकरेंना बोलत आहेत संजय राऊत असं म्हणत सोमय्यांनी कागदपत्रे पुन्हा एकदा दाखवली.
रश्मी ठाकरे यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता कर ग्रामपंचायतीत भरलाय. इतकंच नाही तर रश्मी उद्धव ठाकरे यांनी त्याआधीचा प्रॉपर्टी टॅक्स अन्वय नाईकच्या नावाने, त्यानंतर रश्मी ठाकरेंनी भरलाय. सोमय्यांनी नाही. तुम्ही जोड्याने कुणाला मारणार आहात?
अन्वय नाईकने २००८ मध्ये बंगले बांधले. २००९ पासून १९ बंगल्यांचा कर हा रश्मी ठाकरे आणि वायकर यांनी भरला आहे. रश्मी ठाकरे आणि मनिषा रविंद्र वायकर यांनी जागा कधी घेतली? गेल्या वर्षीपर्यंत ते कर भरत होते. जर बंगले त्यांच्या नावावर नाहीत तर मग कर का भरला?
'कशाला खोली सॅनिटाईज करता, मी येतो तुरुंगात!'
संजय राऊत यांनी सोमय्यांवर आरोप केल्यानंतर ट्वीट केलं. यामध्ये बाप-बेट्यांना जेलमध्ये टाकणार असल्याचं ते म्हणाले. यानंतर सोमय्यांनी पत्रकार परिषद घेतली. कोरोना काळात ठाकरे सरकारने केलेला घोटाळा बाहेर काढणार असल्याचं ते म्हणाले. मला जेलमध्ये टाकणार असाल तर, मी स्वत: येतो, असं ते म्हणाले. कशाला खोली सॅनिटाईज करता, असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे. एका दमडीचा घोटाळा काढून दाखवा, असं चॅलेंज त्यांनी केलंय. माझ्यावर १३ केसेस आहेत. १४ वी पाईपलाईनमध्ये आहे. आता आणखी एक केस लागली तरी फरक पडत नाही असं सोमय्या म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.