Mother’s Day 2023: 'सुपर मॉम'! या आहेत सुपर 7 मदर इंडिया... सर्वांचीच कहानी आहे प्रेरणादायी

जगातील बहुतांश देशात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो.
Mothers day 2023
Mothers day 2023sakal
Updated on

जगातील बहुतांश देशात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. स्त्रीचे अस्तित्व हे नेहमीच युद्धच राहिले आहे. तिला अभ्यास करू द्यायचा की नाही, तिचे लग्न कोणत्या वयात व्हायला हवे, किंवा तिला मूल कधी व्हायला हवे, यासारखे अनेक प्रश्न आहेत.

मदर्स डे हा दिवस जगातली सर्व मातांसाठी डेडीकेटेड आहे खरंतर प्रत्येक आई स्पेशल असते. सुपर आहे. पण त्यातल्या त्यात काही माता या सुपर से भी उपर आहेत. चला तर त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात..

बॉलिवूड मॉम्स

ऐश्वर्या राय- ऐश्वर्या राय बच्चन केवळ अभिनेत्रीच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. ऐश्वर्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जाते पण आई झाल्यानंतर ऐश्वर्याने तिचे करिअर थांबवले होते.ऐश्वर्या तिच्या गरोदरपणानंतर वाढलेल्या वजनामुळे खूप ट्रोल झाली होती. या सगळ्याची पर्वा न करता आराध्या मोठी होईपर्यंत ऐश्वर्याने कोणताही चित्रपट साईन केला नाही.

Mothers day 2023
Mother's Day : मोदींची आई धुणीभांडी करायची; वाचा संघर्षमय मायलेकराची कहानी

शिल्पा शेट्टी कुंद्रा- शिल्पा अलीकडे योगगुरू म्हणून ओळखली जाते, आणि हेल्थ फ्रीक आहे. तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ती दोन लहान मुलांची आई आहे. अनेक हिंदी गाण्यांमध्ये शिल्पा तिच्या अपवादात्मक ठुमक्यासाठी ओळखली जाते.

ती तिच्या व्हिडिओ आणि पुस्तकांद्वारे मुलांसाठी निरोगी पण चवदार स्वयंपाकाचा संदेश देखील पसरवत आहे. आई म्हणून ती कधीच अपयशी ठरली नाही.

ब्लॉगर मॉम्स

रोशनी भाटिया- रोशनी उर्फ @thechiquefactor ही एक फॅशन ब्लॉगर आहे. रोशनी एका डिजिटल ब्युटी आणि एंटरटेनमेंट प्लॅटफॉर्मवर काम करताना दिसली पण ब्लॉगर म्हणून तिची कारकीर्द सुरू ठेवण्यासाठी तिने कंपनी सोडली.

तिला एक मुलगा आहे - अर्जुन. आई आणि मुलगा दोघांनाही नाचताना आणि गप्पा मारताना एकमेकांसोबत हँग आउट करायला आवडते. आणि सर्व आईंना मातृत्वाच्या टिप्स आणि युक्त्या देण्यासाठी, रोशनीने #motherhoodmonday नावाची मालिका सुरू केली आहे.

श्रुती अर्जुन आनंद- श्रुती तिच्या नावाने एक यूट्यूब चॅनल चालवते आणि ती एका लहान मुलीची अभिमानी आई आहे. श्रुती झाशी शहरातून आहे तिची गणना बेस्ट इन्फ्लुएन्सर म्हणून केली जाते.

श्रुती एक आई आणि YouTuber म्हणून यशस्वीपणे काम करत आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इतर अनेक भारतीय माता तिच्याकडे पाहतात.

आईपीएस मॉम्स

किरण बेदी- एक निडर, कर्तव्यदक्ष देशाच्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून किरण बेदींनी आपली कारकीर्द गाजवली होती. एक आयपीएस अधिकारी असल्याने, किरण त्यांच्या कडक आदेशांसाठी आणि गुन्हेगारांना हाताळण्याच्या पद्धतीसाठी ओळखल्या जात होत्या.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्या एक कार्यकर्त्या बनल्या आणि 'भ्रष्टाचारमुक्त भारत'साठी अनेक मोर्चात सहभागी झाल्या. तुम्हाला माहीत आहे का, त्या पहिल्या टेनिसपटूही होत्या. त्यांना एक मुलगी आहे, सायना, जिच्याकडे किरण यांनी देशाची सेवा करत असताना कधीही लक्ष दिले नाही.

बॉक्सर मॉम

मेरी कॉम- भारतीय बॉक्सर मेरी कॉमची कहाणी इतकी प्रेरणादायी आहे, की तिच्यावर सिनेमाही निघाला होता. प्रियंका चोप्रानं या सिनेमा मेरी कॉमची भूमिका साकारली होती.

गरीब कुटुंबातून येत तगडा संघर्ष तर मेरी कॉमने केलाच. पण आई झाल्यानंतर आपल्या खेळासोबतच तिला जो संघर्ष करावा लागला, तो अंगावर काटा आणणारा होता.

चार मुलांची आई असलेली मेरी कॉम 2012 मध्ये जेव्हा गोल्ड मेडल जिंकली, तेव्हा तिनं आपण सुपर मॉम असल्याचं सिद्ध केलं. मेरीला दोन जुळी मुलं आहेत. 2005 मध्ये ती आई झाली. 2013 मध्येही तिनं पुन्हा एका मुलाला जन्म दिला.

त्यानंतर 2018 मध्ये तिनं एका मुलीला दत्तक घेतलं होतं. कॉमनवेल्थ आणि एशियन गेम्समध्येही मेरी कॉमने गोल्ड मेडल जिंकलंय. तसंच पाच वेळा एशियन चॅम्पियनही ठरली आहे.

टेनिस प्लेअर मॉम

सानिया मिर्झा- सानिया मिर्झा अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरली. तिनं 2013 मध्ये निवृत्ती घेतली. पण त्याआधी ती भारताची नंबर वन टेनिल प्लेअर होती. 2010 मध्ये सानियाचं लग्न झालं. 2018 मध्ये तिला बाळ झालं. यानंतर दोनच वर्षांनी 2020 साली सानिया होबार्ट इंटरनॅशनल खेळली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.