भारतात उपलब्ध होणारी Sputnik V लस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही

भारतात उपलब्ध होणारी Sputnik V लस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही
Updated on

पुणे : देशात सध्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड (covishield) लस तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन (Covaxin) लस उपलब्ध आहे. आणि आता यामध्ये जगात सर्वांत आधी आणल्या गेलेल्या कोरोना लशीची भर पडणार आहे. म्हणजेच भारतात आता रशीयन बनवाटीची स्फुटनिक- व्ही लस (Sputnik V vaccine) देखील उपलब्ध होणार आहे. ही माहिती भारत सरकारकडून देण्यात आली आहे. आज डॉक्टर रेड्डीज लॅबोरेट्रीजच्या माध्यमातून हैदराबादमध्ये या लसीचा पहिला डोस दिला गेलाय. काय आहे ही लस आणि ती किती परिणामकारक आहे? या लसीचा दर कसा असणार आहे? या सगळ्याविषयीच आपण आज माहिती घेणार आहोत... (Know everything about the Sputnik V vaccine available in India)

जगात सर्वांत आधी कोरोना लस आणली होती ती रशियाने. अगदी कमी वेळात स्फुटनिक व्ही ही लस रशियाने आणल्यानंतर संपूर्ण जगानेच आश्चर्य व्यक्त केलं होतं तसेच भीतीही व्यक्त केली होती. जगभरात सध्या फायजर, ऑक्सफर्ड-ऍस्ट्राझेंका, मॉडर्ना, जेनसेन, कोव्हॅक्सिन, कोविशील्ड, स्फुटनिक या काही प्रभावी लसी उपलब्ध आहेत. यांपैकी कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लस भारतात उपलब्ध असून आता स्फुटनिक व्ही लस देखील भारतात उपलब्ध होत आहे.

भारतात उपलब्ध होणारी Sputnik V लस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही
Israel-Palestine Conflict: गाझामध्ये घुसण्याचा इस्राईलचा इशारा

स्पुटनिक व्ही लस पुढील आठवड्यापासून मिळणार असल्याची माहिती नीती आयोग सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिली आहे. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड आणि डॉ. रेड्डी लॅब यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. आज कंपनीने लसीच्या किंमतीची घोषणा केली आहे. या लसीचा एक डोस ९४८ रुपयांना उपलब्ध असणार आहे. त्यावर पाच टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे, त्यामुळे एकूण किंमत ९९५ रुपये ४० पैसे इतकी असेल असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ही रशियन बनावटीची लस भारतात सरासरी एक हजार रुपयांना उपलब्ध होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. या लसीची निर्मिती भारतात झाल्यास त्याची किंमत कमी होईल. भारतात लसी तयार करणाऱ्या सहा कंपन्यांशी या लसीच्या उत्पादनाबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान, निती आयोगाच्या एका सदस्याने डिसेंबरपर्यंत देशात कोविड व्हॅक्सिनचे 200 कोटीहून अधिक डोस भारताला उपलब्ध होतील असा दावा केला आहे.

रशियाने स्फुटनिक-व्ही या लशीची 16000 लोकांवर चाचणी घेतली होती. या चाचणीमध्ये या लोकांना दोन-दोन डोस देण्यात आले होते. या लशीला सर्वांत आधी म्हणजे 11 ऑगस्टला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर लसनिर्मितीचा दावा करणारा रशिया हा जगातील पहिला देश बनला होता. रशियाने कोविडच्या या लसीचं नामकरण हे Sputnik V ला या त्यांच्या पहिल्या उपग्रहावरून केले आहे.

भारतात उपलब्ध होणारी Sputnik V लस काय आहे? जाणून घ्या सर्वकाही
कोविशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक V; असा आहे 3 लशींमध्ये फरक

रशियाची ही लस एडीनेव्हायरस व्हेक्टरवर आधारित असल्याचं सांगण्यात आलंय. तसेच ही लस रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलीलाही देण्यात आली होती. ही लस मॉस्कोमधील गमालिया इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजी एँड मायक्रोबायोलॉजीने तयार केली आहे. रशियामध्ये ही लस मोफत दिली जात आहे. रशियाने ही लस आणल्यानंतर या लशीबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली होती. घाईगडबडीत चाचण्यांविना आधीच लशीला मंजूरी देण्याचा निर्णय घातक असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला होता. मात्र, रशियाची स्पुटनिक- 5 ही कोरोना लस 92 टक्के परिणामकारक असल्याचे लॅन्सेट या प्रसिद्ध जर्नलन म्हटले आहे. ही लस दिल्यास लोकांचे प्राण वाचू शकतील आणि रुग्णालयातही जाण्याची गरज पडणार नाही असं देखील लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या प्रबंधात म्हटले आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, रशियामधून पहिला साठा हा १ मे रोजी भारतात दाखल झाला. स्थानिक औषध प्रशासनाने त्याला १३ मे रोजी मान्यता दिली. पुढील काही महिन्यांमध्ये टप्प्याटप्प्यात या लसीचा साठा पाठवला जाईल. कंपनी सध्या भारतातील सहा कंपन्यांसोबत ही लस बनवण्यासंदर्भात चर्चा करत असल्याचे सांगण्यात आलं आहे. अनेक संशोधनांमध्ये ही लस 90 ते 92 टक्के परिणामकारक असल्याचं दिसून आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.