दिल्ली पोलिसांनी एका माजी महिला पोलीस कॉन्स्टेबलची हत्या केल्याच्या प्रकरणी एका हेड कॉन्स्टेबलसह तीन जणांना अटक केली आहे. ही मृत महिला तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता होती. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हेड कॉन्स्टेबल सुरेंद्र राणा (४२) आपल्याच एका २८ वर्षीय सहकारी महिला कॉन्स्टेबलसोबत कथितरित्या विवाहबाह्य संबंध होते. महिलेसोबत वाद झाल्यानंतर तीची हत्या करण्यात आली होती.
महत्वाची बाब म्हणजे या हत्याकांडाचा मास्टरमाइंड असलेला हा हेड कॉन्स्टेबल मोठ्या शिताफीने पोलीस आणि महिला कॉन्स्टेबलच्या कुटुंबीयांना दोन वर्षांपर्यंत खोटं बोलून फसवत राहिला. त्याने दोन वर्ष महिलेच्या कुटुंबाला पटवून दिलं की ती अजूनही जिवंत आहे. इतकेच नाही तर त्यांने तीच्यासोबत कुटुंबियांचं बोलणं देखील करून दिलं.
एनडीटीव्हीने दिलेल्या रिपोर्टनुसार, हत्येचा उलगडा अखेर झाला असून आरोपी सुरेंद्र सिंह याला त्याच्या दोन साथीदार पोलिसांसह अटक करण्यात आली आहे. सुरेंद्रचे लग्न झालेलं अशून तो पीसीआर यूनिटमध्ये नोकरी करत होता.
दिल्ली पोलीसमध्ये हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या सुरेंद्र सिंह राणा (४२) याची एक महिला कॉन्स्टेबलसोबत मैत्री झाली, ज्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. पण कथितरित्या जेव्हा महिला त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा तिच्या हत्या करण्यात आली. सुरेंद्रने त्याच्या मेव्हणा रविन (२६) आणि राजपाल (३३) यांनी महिला कॉन्स्टेबलचा मृतदेह आणि गुन्हा दोन्ही लपवून ठेवण्यात सुरेंद्र सिंह याची मदत केली होती.
पीडित पहिलेचे नाव मोना असे अशून ती सुरेंद्र राणा याच्या नंतर दोन वर्षांनी २०१४ साली दिल्ली पोलिसमध्ये कॉन्स्टेबल पदावर रुजू झाली होती. दोघेही कंट्रोल रूममध्ये काम करत. येथेच दोघांची एकमेकांशी ओळख झाली. यादरम्यान मोनाला यूपी पोलिसमध्ये सब-इन्स्पेक्टरची नोकरी मिळाली होती, ज्यानंतर तिने दिल्ली पोलीसमधील नोकरी सोडली आणि ती यूपीएससीची तयारी करू लागली होती.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनाने नोकरी सोडल्यानंतर देखील सुरेंद्र तिच्यावर लक्ष ठेवत होता. जेव्हा याबद्दल मोनाला समजले तेव्हा तिने याचा विरोध केला. ८ सप्टेंबर २०२१ रोजी दोघांमध्ये कथित भांडण झालं ज्यानंतर सुरेंद्र मोनाला एका निर्जणस्थळी घेऊन गेला आणि तिचा गळा दाबून हत्या केली, त्यानंतर तिचं प्रेत नाल्यात फेकून दिलं. इतकेच नाही तर मृतदेह लपवण्यासाठी त्यावर दगड देखील टाकले.
अन् त्याने कट रचला
मोनाच्या मृत्यूची बातमी लपवण्याचा कट सुरेंद्रने रचला, मोनाच्या कुटुंबीयांना फोन करून ती कोणीतरी अरविंद सोबत पळून गेल्याचे सांगितले. तो मोनाच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहिला आणि तिला शोधण्याचे नाटक करत होता. त्यांच्यासोबत तो अनेकदा पोलिस स्टेशनलाही गेला होता. मोना जिवंत असल्याचे कुटुंबीयांना दाखवण्यासाठी त्याने एका महिलेला कोरोनाची लस घेण्यासाठी नेले आणि मोनाच्या नावाने प्रमाणपत्रही मिळवले. मोना जिवंत असल्याचे दाखवण्यासाठी त्याने तिच्या बँक खात्यातून व्यवहारही केले आणि तो तिचे सिमकार्डही वापरत राहिला.
मेव्हणा करायचा मदत
कधी कधी तो घरच्यांना सांगायचा की, मोना कुठे आहे याची माहिती मिळाली आहे आणि मोनाचा शोध घेण्यासाठी तो कुटुंबासह पाच राज्यांतील अनेक शहरांमध्ये ही गेला होता. इतकंच नाही तर सुरेंद्रने आपला मेहुणा रविनयालाही या कटात सामील करून घेतलं, रविन मोनाचा कथित बॉयफ्रेंड अरविंद असल्याचे भासवून मोनाच्या कुटुंबीयांशी देखील बोलला.
एकदा फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान 'अरविंद' बनलेल्या रविनने मोनाच्या घरच्यांना सांगितले की, दोघे गुडगावमध्ये आहेत आणि त्यांचे लग्न झाले आहे. माझं कुटुंब आमच्या जीवावर उठलं आहे. आम्ही पंजाबला जात आहोत आणि रोहतकला पोहोचलो आहोत. आम्ही १०-१५ दिवसांत तुमच्या घरी येऊ. जेव्हा त्याने मोनाला त्याच्याशी बोलण्यास सांगितले तेव्हा ती घाबरली आहे आणि त्याच्याशी बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगितले.
विशेष पोलिस आयुक्त (गुन्हे) रवींद्र यादव यांनी सांगितले की, पोलिस आणि पीडितेच्या कुटुंबाची फसवणूक करण्यासाठी रविन कॉल गर्ल्ससोबत हरियाणा, डेहराडून, ऋषिकेश आणि मसूरी येथील हॉटेलमध्ये देखील जात होता. रविनने जाणीवपूर्वक पीडितेची काही कागदपत्रे हॉटेलमध्ये ठेवली आणि त्यांना फोन करून त्यांची माहिती दिली. जेव्हा पोलीस कॉल ट्रेस करून हॉटेलमध्ये पोहोचायचे, तेव्हा तिथले कर्मचारी मोना तिथे आल्याची सांगायचे. यामुळे मोनाला खरोखरच तिच्या आई-वडिलांकडे परत जायचे नाही, असे पोलिसांना वाटले. ''
आरोपीकडे मोनाचे अनेक रेकॉर्डेड ऑडिओ होते जे तो एडिट करून तिच्या कुटुंबियांना पाठवायचा जेणेकरून त्यांना ती जिवंत असल्याचा विश्वास बसेल. त्यातील एका एडिट ऑडिओमध्ये मोना तिला घरी परतायचे नाही कारण आई माझ्यावर रागावली आहे असं म्हणताना ऐकू येतं.
अखेर दोन महिन्यांपूर्वी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे आल्यानंतर अधिकाऱ्यांनी रविनने अरविंदच्या बनून वापरलेला नंबर शोधण्यास सुरुवात केली आणि मोनाच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. आमच्या तपासात हा नंबर राजपाल नावाच्या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले असून अनेक पुरावे गोळा केल्यानंतर हा कट उघडकीस आला आहे. हत्येनंतर मोनाला ज्या नाल्यात फेकून देण्यात आले होते, त्या नाल्यातून पोलिसांनी तिचे मृतदेह बाहेर काढला आणि तिची ओळख पटविण्यासाठी डीएनए प्रोफाइलिंगसाठी पाठवले.
तिला सरकारी अधिकारी व्हायचं होतं..
यूपीतील बुलंदशहरची रहिवासी मोना ही आभ्यासात हुशार विद्यार्थिनी आणि क्लास टॉपर होती. तिच्याकडे बीएडची पदवी होती आणि तिला सरकारी अधिकारी व्हायचे होते. दुसरीकडे सुरेंद्र राणा हा आधीच विवाहित होता आणि त्याला १२ वर्षांचा मुलगा देखील आहे. मोना हुशार आहे आणि मोठी अधिकारी बनू शकते हे लक्षात आल्यावर राणाने तिच्याशी मैत्री केली आणि तीच्या मागे लागला. मात्र, ती त्याला वडिलांसारखी मानत होती.त्याचा प्रस्ताव नाकारल्यानंतर संतापलेल्या आरोपीने मोनाची हत्या करून मृतदेह नाल्यात पुरला. मात्र अखेर हे प्रकरण उघडकीस आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.