भारतातील मोठ्या शहरांची कोरोनाची स्थिती काय? जाणून घ्या!

भारतातील मोठ्या शहरांची कोरोनाची स्थिती काय? जाणून घ्या!
Updated on

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात आणि झारखंड या राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. मात्र, आता मागील एक महिन्याच्या कोरोनास्थितीवर नजर टाकल्यास बंगळुरु, हैदराबाद आणि पुणे येथील स्थिती बिघडत चालली आहे. पण यातील विशेष बाब म्हणजे मुंबई, दिल्ली, अहमदाबाद आणि चेन्नई या शहरांत मात्र परिस्थिती नियंत्रणात येत आहे. 

बंगळुरु येथे 12.9 टक्के कोरोनाबाधित रुग्ण

बंगळुरु शहरात कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी एक मॉडेल बनला होता. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात होती, मात्र, तिथं आता परिस्थिती बिघडत चालली आहे. बंगळुरुमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दररोज 12.9 टक्क्यांनी वाढ होत आहे.

तर 8.9 टक्के दररोज होणाऱ्या मृतांचे प्रमाण आहे. तर तिथं कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर 1.9 इतका आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे व्हेटिंलेटरवर ठेवलेल्या 97 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. 

सुरतमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतीये

गुजरातच्या सुरत शहरातही कोरोना व्हायरसचे थैमान कायम आहे. या शहरात कोरोनाचे दररोज 4.3 टक्के रुग्ण आढळत आहे. हा दर पुण्याच्या तुलनेने 0.2 टक्के कमी आहे. पण मृतांचा आकडा जास्त आहे. या शहरात कोरोनामुळे दररोज 2.9 टक्क्यांची वाढ झाली आहे. सुरतमध्ये कोरोनाचा मृत्यूदर 2.7 इतका झाला आहे. 

पुण्यातील आकडेवारी चिंताजनक

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले मुंबई शहर आता नियंत्रणात येत आहे. मात्र, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. पुण्यात दररोज 4.5 टक्के इतका कोरोनाचा दर आहे. तर मृतांचा आकडा 2.4 टक्के इतका झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हैदराबादमध्ये मृतांचा आकडा कमी

हैदराबादमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाणात दररोज 7.8 टक्क्यांनी वाढ होत आहे. पण यातील विशेष बाब म्हणजे मागील एक महिन्यापासून इथं एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. या शहरातील मृत्यूदर 0.1 वर गेला आहे. 

मुंबईत सर्वाधिक मृत्यूदर

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच त्यामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. मुंबईचा मृत्यूदर तुलनेने देशात मोठा आहे. पण आता मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्याची स्थिती बिघडत आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()