नियमित लष्करी अन् अग्निवीर जवानांच्या पगारात नेमका फरक काय, जाणून घ्या आकडेवारी?

सध्या सैन्यात अधिकारी ते जवानांना सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार आणि इतर सुविधा दिल्या जातात.
Agnipath
AgnipathSakal
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला (Agnipath Scheme ) देशभरातून विरोध सुरूच असून, यूपी, बिहारपासून ते तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरपर्यंत 15 हून अधिक राज्यात या विरोधात हिंसक घटनांची नोंद करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी (Protest) तोडफोड केली आहे. तर, अनेक ठिकाणी रेल्वेचे डब्बे पेटवण्यात आले आहेत. या सर्वामध्ये काही नागरिक या योजनेचे समर्थन करत आहेत तर, काही लोक या योजनाला जोरदार विरोध करत आहेत. अग्निपथ योजनेंतर्गत भरती होणाऱ्या तरुणांच्या पगाराचीही (Salary) बरीच चर्चा असून, आज आपण अग्निवीर आणि नियमित सैनिकांच्या पगारात नेमका फरक काय ? याबद्दल सोप्या शब्दांत जाणून घेणार आहोत. (Difference Between Regular Army Solider And Agniveer )

Agnipath
Agnipath Protest : पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू, बहिणीप्रमाणे करायची होती देशसेवा

अग्निवीरांना किती मिळणार पगार?

प्रत्येक अग्निवीरला भरतीच्या वर्षात मासिक 30 हजार वेतन देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या वर्षात अग्निवीरचा पगार 33 हजार, तिसऱ्या वर्षी 36 हजार 500 आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये होईल. यातील 70 टक्के रक्कम वेतन म्हणून दिली जाणार आहे. तर, उर्वरित 30 टक्के रक्कम अग्निवीर कॉर्प्स फंड म्हणजेच सेवा निधी पॅकेजमध्ये जमा केली जाणार आहे. म्हणजेच पहिल्या वर्षी अग्निवीरांना दर महिन्याला 21 हजार, दुसऱ्या वर्षी 23,100, तिसऱ्या वर्षी 25,580 आणि शेवटच्या वर्षी 28,000 रुपये रोख वेतन देण्यात येईल.

Agnipath
Threat : दाऊद गँगचा साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना फोन; म्हणाले, तुझा खून होणार

चार वर्षांच्या सेवेनंतर मिळणार एकरकमी 11.71 लाख

चार वर्षांत वेतन कपातीतून एकूण बचत सुमारे 5.02 लाख रुपये होईल. सरकारही तेवढीच रक्कम या निधीत टाकणार आहे. म्हणजेच पीएफप्रमाणे दुहेरी फायदा यामध्ये अग्निवीरांना होणार आहे. शिवाय या रकमेवर व्याजही मिळणार आहे. चार वर्षांत बचत आणि वेतन कपातीसह सरकारचे योगदान दोन्ही मिळून सुमारे 11.71 लाख रुपये होईल. ही रक्कम करमुक्त असेल. अशा प्रकारे चार वर्षांनंतर अग्निवीरला मासिक वेतनाव्यतिरिक्त सेवा निधी पॅकेजमधून एकरकमी 11.71 लाख रुपये दिले जाणार आहेत.

Agnipath
काही लोक 'अग्निपथ'च्या विरोधात गैरसमज पसरवत आहेत : राजनाथ सिंह

नियमित जवानांच्या पगाराचा नियम काय?

सध्या सैन्यात अधिकारी ते जवानांना सातव्या वेतन आयोगांतर्गत पगार आणि इतर सुविधा दिल्या जातात. सैन्यात 17 हून अधिक प्रकारच्या पदे आहेत. त्यांच्या पगाराचे वेगवेगळे नियम आहेत. सिपाही म्हणजे सीमेवर दहशतवादी आणि शत्रूपासून सीमेचे रक्षण करणारे सैनिक होय.

सातव्या वेतन आयोगांतर्गत लष्करातील हवालदार आणि लान्स नाईक यांना दरमहा 21 हजार 700 रुपये वेतन दिले जातात. याशिवाय पगाराच्या 20 ते 30 टक्के रक्कम पीएफ म्हणून जमा केली जाते. तसेच सैनिकांनाही वेळोवेळी नियमानुसार बढती दिली जाते. लान्स नायक पदानंतर नायक पदाचा क्रमांक लागतो. यामध्ये सैनिकांना 25 हजार 500 रुपये वेतन दिले जाते. हवालदाराला 29 हजार 200, नायब सुभेदाराला 35 हजार 400 तर, सुभेदारांना 44 हजार 900 रुपये वेतन दिले जाते.

Agnipath
'2032 पर्यंत सैन्यात 50 टक्के 'अग्निवीर' असणार, दरवर्षी दीड लाख तरुणांची होणार भरती'

अग्निवीर आणि नियमित जवानांच्या पगारात फरक आहे का?

नाही, नियमित सैनिक आणि अग्निवीरांच्या पगारात कोणताही फरक नाहीये. अग्निवीरांचा पगार चार वर्षांसाठी पूर्वनिश्चित आहे, तर सातव्या वेतन आयोगांतर्गत नियमित सैनिकांच्या पगारात दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ केली जाते.

सेवेनंतर दोघांच्या सुविधांमधील फरक ?

चार वर्षांच्या सेवेनंतर अग्निवीरला 11.71 लाख रुपये एकरकमी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे, निवृत्त सैनिकाला ग्रॅच्युइटी म्हणून एकरकमी रक्कम मिळते. चार वर्षांनंतर अग्निवीराला कॅन्टीन, वैद्यकीय सुविधा आदी सेवांचा लाब घेत येणार नाहीये. तर नियमित सैनिकांना सेवानिवृत्तीनंतरही कॅन्टीन, वैद्यकीय आदी सुविधांचा लाभ घेता येतो. याशिवाय सैनिकाला निवृत्तीनंतर आजीवन पेन्शनही मिळते. जे अग्निवीरला मिळणार नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()