Puja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणामुळे चर्चेत आलेला UPSCतील अपंगांसाठीचा कोटा काय असतो? दोषी आढळल्यास नोकरी जाणार?

Puja Khedkar Controversy : महाराष्ट्रातील ट्रेनी आयएएस पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, एखाद्या मानसिकरित्या आजारी व्यक्ती कोट्याच्या माध्यमातून आयएएस बनू शकतो का?
puja khedkar
puja khedkarsakal
Updated on

देशभरात मागील काही दिवसांपासून यूपीएससी आणि आयएएस याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. पूजा खेडकर प्रकरण पुढे आल्यानंतर कोट्यामधून आयएएस म्हणून निवड झालेल्या उमेदवारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यानंतर आयपीएस पूजा खेडकर यांच्यासोबतच आणखी एक आयएएस अधिकाऱ्याचे देखील नाव पुढे येत आहे.

महाराष्ट्रातील ट्रेनी आयएएस पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे की, एखाद्या मानसिकरित्या आजारी व्यक्ती राखीव कोट्याच्या माध्यमातून आयएएस बनू शकतो का? या प्रकरणात पुणे जिल्हाधीकारी दुहास दिवासे यांच्याकडून राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर हे प्रकरण पेटले होते.

या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर आपण, अपंगांसाठी राखीव असलेल्या जागेवर यूपीएससीमध्ये निवड होण्याची प्रक्रिया काय आहे? हे जाणून घेणार आहोत.

puja khedkar
Puja Khedkar Age : तीन वर्षात पूजा खेडकरचं वय वाढलं अवघं एक वर्ष; नेमका काय घातला घोळ?

जेव्हा एखाद्या उमेदवार त्याच्या अर्जात अपंग असल्याचा उल्लेख करतो तेव्हा त्याचे व्हेरिफिकेश तो इंटरव्ह्यू मध्ये सेलेक्ट झाल्यानंतर केले जाते. व्हेरिफिकेशनसाठी यूपीएससीकडून सरकारी रुग्णालयात निश्चित केलेल्या मेडिकल बोर्डात वेळ आणि तारीख दिली जाते. याच कालावधीत फिजिकली हँडिकॅप्ड उमेदवारांचे व्हेरिफिकेशन देखील होते. हे मेडिकल बोर्ड यूपीएससीशी संबंधीत असते.

आज तकने दिलेल्या रिपोर्टनुसार, आयपीएस आणि पोलिस सर्व्हिसमध्ये कोणीही PWD (पर्सन वीद डिसेबिलिटीज) कँडिडेट जाऊ शकत नाही. यसह आयएएस सर्व्हिसेससाठी देखील मेंटल फिटनेस खूप आवश्यकत असते. तसेच पूजा खेडकर यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास कोणताही उमेदवार दोन वर्षांपर्यंत प्रोबेशनवर असतो, आणि जर दोन वर्षात त्यांचे मेडिकल व्हेरिफाय झाले नाही तर दोन वर्षानंतर त्यांना काढून टाकले जाते. जोपर्यंत कोटा अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत पोस्टिंग कंडीशनल असते.

यूपीएससी मध्ये डिसेबिलिटी कोटा चार प्रकारचा असतो, यामध्ये ऑर्थो, व्हिज्युअल, हियरिंग, मल्टिपल डिसेबिलिटीज यांचा समावेश यामध्ये होतो. तसेच RPwD (Right of Person with diability) Act मध्ये २१ डिसेबिलिटीज ओळखण्यात आल्या आहेत. यापैकी अनेक या मेंटल संबंधीत आहेत. याशिवाय अॅसिड अटॅक सर्व्हायवरचा देखील यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

puja khedkar
Pune Crime : 'ती' मद्य पार्टी ठरली अखेरची... पुण्यात १६ वर्षीय मुलीने नशेत संपविले जीवन, मैत्रीण आढळली बेशुद्धावस्थेत

RPWD Act 2026 काय सांगतो?

शारीरीकरित्या सक्षम नसलेल्या उमेदवारांसाठी सरकारने २०१६ मध्ये राइट्स ऑफ पर्सन्स विद डिसेबिलिटीज अॅक्ट (RPWD Act) मंजूर केला होता. या कायतद्यानुसार सरकार पाच प्रकारच्या डिसेबिलिटीजसाठी आरक्षण निश्चित केले आहे. यूपीएससीने वेगवेगळ्या नोकऱ्यांमध्ये यासाठी कॅटेगरी तयार केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या कायद्यात काही गोष्टींची भर टाकण्यात आली आहे. या पाच डिसेबिलिटी कॅटेगरींना बेंचमार्क डिसेबिलिटी म्हटले जाते.

- दृष्टिहीन किंवा दृष्टिबाधित किंवा ज्यांना कमी दिसते.

-श्रवण बाधित ज्यांना ऐकू येत नसेल किंवा कमी ऐकू येत असेल.

- ज्यांच्या स्नांयूंचा विकास झाला नाही, जसे की चालता-फिरता न येणार लोक, याशिवाय सेरेब्रल पॉल्सी, कुष्ठ रोग बरा झालेले लोक, उंची न वाढलेले तसेच अॅसिड अटॅक पीडित.

-ऑटिझम, बौद्धिक अपंग, विशिष्ट गोष्टी शिकण्यासंबंधीचे अपंगत्व आणि मानसिक आजार

-वर दिलेल्या चार पर्यायांपैकी एक किंवा एकाहून अधिक प्रकारचे अपंगत्व.

अपंग उमेदवारांना काय सुविधा मिळतात?

संघ लोकसेवा आयोग शारीरीकरित्या अपंग उमेदवारांना वयाच्या मर्यादेत सूट देते, पदांमध्ये आपक्षण आणि परीक्षा केंद्रावर विशेष सुविदा देखील मिळतात. यासोबतच युपीएससीसाठी शारीरीकरित्या अपंग उमेदवारांसाठी विशेष निकष देखील तयार केले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.