Arvind Kejriwal Wife : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल नेमकं करतात काय? जाणून घ्या

Know who is Sunita Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ई़डीच्या कोठडीत आहेत. ईडीने केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक केली आहे.
know who is delhi cm Arvind Kejriwal Wife sunita kejriwal what is her role Marathi news
know who is delhi cm Arvind Kejriwal Wife sunita kejriwal what is her role Marathi news
Updated on

Know who is Sunita Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ई़डीच्या कोठडीत आहेत. ईडीने केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात अटक केली आहे. यादरम्यान सुनिता केजरीवाल या त्यांच्या पत्नी सध्या चर्चेत आल्या आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी तुरुंगातून जनतेसाठी एक संदेश पाठवला होता, जो त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी आज एका व्हिडिओच्या माध्यमातून वाचून दाखवला.

या सर्व घडामोडीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी जर राजीनामा दिला तर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार असल्याचे बोलले जात होते. मात्र आम आदमी पक्षाने आणि स्वतः केजरीवाल यांनी जेलमध्ये गेल्यानंतर देखील तेच तुरुंगातून मुख्यमंत्रीपद सांभाळतील आणि राजीनामा देणार नसल्याचे म्हटले आहे.

know who is delhi cm Arvind Kejriwal Wife sunita kejriwal what is her role Marathi news
Arvind Kejriwal : केजरीवालांना अटक, पुढे काय? सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री होतील का? 'या' नेत्यांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या

सुनीता केजरीवाल कोण आहेत?

सुनिता केजरीवाल या त्यांच्या पती प्रमाणे सक्रिय राजकारणात नाहीयेत. त्या एक हाउसवाइफ आहेत आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच घर सांभाळतात. मात्र सुनीता केजरीवाल या आयआरएस अधिकारी राहिल्या आहेत. त्यांनी आठ वर्षांपूर्वी या पदावरून व्हीआरएस घेतला होता. त्यांनी १३ जुलै रोजी व्हीआरएस घेतला त्या त्याच्या दोन दिवसांनंतर रिटायर होणार होत्या. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी देखील २००६ साली याच पदावरून राजीनामा दिला होता. केजरीवाल तेव्हा भारतीय महसूल सेवेत सहआयुक्त म्हणून नियुक्त होते.

know who is delhi cm Arvind Kejriwal Wife sunita kejriwal what is her role Marathi news
Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेवर जर्मनीचं स्टेटमेंट; भारताचा संताप, परराष्ट्र मंत्रालयाने दूताला घेतलं बोलावून

केजरीवाल यांच्याशिवाय पत्नी सुनीता केजरीवाल या देखील महसूल अधिकारी म्हणून काम करत होत्या. इतकेच नाही तर नाही तर दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर केजरीवाल यांनी त्या विजयाचे श्रेय पत्नीला दिले होते. सीएम केजरीवाल आणि पत्नी सुनीता यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव पुलकित आणि मुलीचे नाव हर्षिका आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.