शिमला - सुखविंदर सिंग सुक्खू हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. काँग्रेस हायकमांडने याला दुजोरा दिला आहे. सुखविंदर सिंग सुक्खू यांचं नाव राष्ट्रीय राजकारणात आतापर्यंत तितकंच लोकप्रिय झालं नाही, मात्र हिमाचल प्रदेशच्या राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे.
नाडौन विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले सुखविंदरसिंग सुखू हिमाचल प्रदेश काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षही आहेत. त्यांचा जन्म २६ मार्च १९६४ रोजी हमीरपूर जिल्ह्यातील नादौन तहसीलमधील सेरा गावात झाला. सुखविंदरसिंग यांचे वडील रसिल सिंग हे हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन सिमला येथे चालक होते, तर आई संसार देई गृहिणी आहेत. (Himachal Pradesh news in Marathi)
सुखविंदरसिंग यांनी सुरुवातीच्या काळात छोटा शिमला येथे दुधविक्री करत होते. 1998 मध्ये त्यांचा विवाह झाला असून त्यांना दोन मुली आहेत. सुखविंदरसिंग यांनी शिमला येथून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. तसेच महाविद्यालयांमध्ये वर्ग प्रतिनिधी, विद्यार्थी सेंट्रल संघटनेचे सरचिटणीस आणि स्टुडंट सेंट्रल असोसिएशनचे अध्यक्ष झाले. त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा एनएसयूआयपासून केली.
सुखविंदरसिंग १९८८ ते १९९५ या काळात ते एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर १९९५ मध्ये त्यांना युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस करण्यात आले. १९९८ ते २००८ या काळात ते युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. २००८ साली ते प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस झाले. 2013 ते 2019 पर्यंत त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
सुखविंदरसिंग हे दोनदा शिमला महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. 2003, 2007, 2017 आणि आता 2022 मध्ये ते चौथ्यांदा आमदार झाले. निवडणुकीपूर्वी त्यांना हिमाचल प्रदेश काँग्रेस निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष आणि तिकीट वाटप समितीचे सदस्य करण्यात आले होते.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर सुखविंदरसिंग सुखू यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्रीपदासाठी करण्यात आली. हिमाचल प्रदेशचे ते 15 वे मुख्यमंत्री असतील.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.