सेम टू सेम! जुळ्या मुलांसाठी प्रसिद्ध आहे हे गाव! डॉक्टरही चक्रावले

Twins Village, Kerala: केरळमधील कोडिन्ही हे गाव जुळ्या मुलांसाठी प्रसिद्ध आहे.
kidinhi Village, Kerala Twins Village
kidinhi Village, Kerala Twins Villagesakal
Updated on

भारतात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गावं आहेत. केरळच्या (Kerala) मालापुरम जिल्ह्यात एक रहस्यमय गाव आहे. 2000 लोकसंख्या असलेलं हे गाव एका कारणासाठी सर्वत्र प्रसिद्ध आहे, ते म्हणजे या गावातील जुळ्या मुलांचा जन्म...या गावात जुळी मुलं जन्माला येण्याचं प्रमाण इतकं जास्त आहे की डॉक्टरहून चक्रावून गेले आहेत. या वैशिष्ट्यपूर्ण गावाचं नाव कोडिन्ही (Kodinhi) असं असून या गावात जुळ्या मुलांचा जन्म होणं ही खूपच सामान्य गोष्ट मानली जाते. नाक, कान, दात, तोंड, उंची यांनी सारखी असणारी अनेक मुलं या गावात आहेत.(Kodinhi, a village in Kerala, is famous for its twin children)

kidinhi Village, Kerala Twins Village
National Science Day: मेहनतीचं चीज झालं; देशाला नोबेल मिळालं

केरळमधील हे गाव जुळ्यांचं गाव म्हणून ओळखलं जात आहे. या गावात एक ना दोन तब्बल 220 हून अधिक जुळ्या मुलांची संख्या आहे. 1949 मध्ये या गावात पहिल्यांदा दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला होता. जसजसा काळ जात होता, तसंतशी ही संख्या वाढतच गेली. सर्व्हेक्षणानुसार सध्या 1 ते 10 वर्ष वयोगटातील तब्बल 79 जुळी मुलं गावात आहेत. यावरुनच या गावात जुळ्यांच्या संख्येचा अंदाज लावला जाऊ शकतो.

kidinhi Village, Kerala Twins Village
Video: 'मायभूमी'त मिळतीये नाश्त्यासह वाचनाची मेजवानी

दरम्यान कोडिन्ही गावात सध्या 220 पेक्षा जास्त जुळ्या जोड्यांमुळे हे गाव आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या नजरेतून सुटू शकले नाही. या गावातील जुळ्या मुलांचा जन्मदर भारतात जन्मलेल्या जुळ्या मुलांच्या जन्मदरापेक्षा खूप जास्त आहे. या बाबतीत जगातील देशांमध्ये भारताचे स्थान खूपच कमी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.