Mustard Seed Oil : लाकडी क्रशरमधून काढलेले मोहरीचे तेल कँसर रुग्णांसाठी उपयुक्त! महत्वाचं संशोधन आलं समोर

Mustard Seed Oil : क्रशरमधून काढलेल्या मोहरीच्या तेलामध्ये ऑरंटियामाइड एसीटेट नावाचे कर्करोगविरोधी संयुग आढळले आहे.
Kolhu-Extracted Mustard Oil Contains Anti-Cancer Compound
Kolhu-Extracted Mustard Oil Contains Anti-Cancer Compound
Updated on

हरिद्वार, ता. ७ : लाकडी क्रशरमधून काढलेल्या मोहरीच्या तेलावर ‘पतंजली’ने संशोधन केले आहे. त्यात पारंपरिक लाकडी क्रशरमधून काढलेले मोहरीचे तेल केवळ कर्करोगापासून बचाव करत नाही, तर ते बरे करण्यासही मदत करते, असे सिद्ध झाले आहे. जगप्रसिद्ध संशोधन जर्नल ‘फूड केमिस्ट्री’मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार, क्रशरमधून काढलेल्या मोहरीच्या तेलामध्ये ऑरंटियामाइड एसीटेट नावाचे कर्करोगविरोधी संयुग आढळले आहे. (Kolhu-Extracted Mustard Oil Contains Anti-Cancer Compound )

या संशोधनाबाबत स्वामी रामदेव म्हणाले, ‘‘हे केवळ एक संशोधन नसून आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या विविध क्रिया विविध प्रकारच्या रोगांशी लढण्यासाठी कशा प्रकारे उपयुक्त ठरल्या, हे आपल्या गौरवशाली भारतीय परंपरेचा थेट परिणाम आहे. संशोधन हे देखील पुष्टी करते, की विज्ञानाचा खरा अर्थ केवळ मोठ्या मशिन नाही, तर वरवर साधे तंत्रज्ञान आहे. जे लोकांचे जीवन सुधारण्यात मोठी भूमिका बजावेल.

Kolhu-Extracted Mustard Oil Contains Anti-Cancer Compound
Gig Workers Lok Sabha Election: कॅब चालक, स्विग्गी-झोमॅटोचे चार प्रतिनिधी लोकसभेसाठी सज्ज? 'या' मतदारसंघात देणारं झुंज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.