Kolkata Murder Case: कोलकाता घटनेनंतर गृह मंत्रालयाचं मोठं पाऊल; देशातील सर्व पोलिसांना दर दोन तासांनी द्यावा लागणार रिपोर्ट

Mamata Banerjee warned Bengal Police investigate of kolkata girl victim case  by Sunday or transfer it to the CBI
Mamata Banerjee warned Bengal Police investigate of kolkata girl victim case by Sunday or transfer it to the CBIsakal
Updated on

Amit Shah: कोलकातामध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या आणि खूनाच्या घटनेनंतर जगभरातून संताप व्यक्त होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील सर्व पोलिस दलांना निर्देश जारी केलेल आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी दुपारी दिलेल्या निर्देशानुसार, आता पोलिसांना दर दोन तासाला आपल्या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेचा एक रिपोर्ट गृह मंत्रालयाला पाठवाला लागणार आहे. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांना हे बंधनकारक असेल.

कायदा आणि सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्राने हे पाऊल उचलंल आहे. या आदेशामध्ये सततच्या अपडेट्सवर भर देण्यात आलेला असून सर्व पोलिस दलांना ई-मेल, फॅक्स किंवा व्हॉट्सअपद्वारे मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला माहिती पुरवावी लागेल.

देशात कुठे काय घडतंय आणि त्यावर त्वरित पावले कशी उचलता येतील, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. कोलकाता येथील संताप आणणाऱ्या घटनेनंतर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने असे आदेश काढले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.