Kolkata Doctor Murder: हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री जमावाचा धुडगूस, तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल

Kolkata Doctor Murder Case: आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्येही ही निदर्शने झाली. दरम्यान, रुग्णालयात प्रचंड गोंधळ सुरू झाला. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. वाचा सविस्तर...
RG Kar Medical College vandalized
RG Kar Medical College vandalizedESakal
Updated on

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेजमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ गुरुवारी रात्री देशात अनेक ठिकाणी 'रिक्लेम द नाईट' नावाने निदर्शने सुरू झाली. या निदर्शनाला 'रिक्लेम द नाईट' असे नाव देण्यात आले. काही वेळातच कोलकाता येथे आयोजित आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. आंदोलकांच्या वेशात काही लोकांच्या गटाने आरजी कार मेडिकल कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश केला. रुग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केले आणि तोडफोड केली. या काळात अनेक वाहनांचेही नुकसान केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.